बीड (रिपोर्टर): आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे अॅक्शन मोडवर आल्याचे दिसून येत असून आज त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन या ठिकाणी पदाधिकार्याचीं बैठक बोलवली असून जिल्हाभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित जाले असून रिपाइंने एक नाही दोन नाही तर आता सहाही मतदारसंघांवर आपले लक्ष केंद्रित करर्याबाबत पदाधिकार्यांचे म्हणणे आहे. त्यावर रिपाइंच्या बैठकीत चर्चा होत आहे. दुपारनंतर पप्पू कागदे उपस्थितांना संबोधित करत रिपाइंच्या भूमिकेची घोषणा करणार आहे तर दुसरीकडे रिपाइंचे सर्वेसर्वा खा. रामदास आठवले हे जिल्हा दौर्यावर येत आहेत. त्यावरही चर्चा होत आहे.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्यात विविध पक्ष-संघटना आपआपल्या पक्षांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन जात आहे. गेल्या कित्येक वर्षापासून दिनदलित-पथदलितांसह कष्टकर्यांसाठी लढा उभारणारे रिपाइंचे पप्पू कागदे अॅक्शन मोडवर आले आहेत. आज त्यांनी जिल्हाभरातील रिपाइंच्या पदाधिकार्यांशी महत्वपूर्ण बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवनात बोलवली आहे. या बैठकीला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित झाले असून उद्याच्या निवडणुकीत आपली ताकद सहाही मतदारसंघात दाखवण्याबाबत पदाधिकार्यांनी आपली भूमिका मांडली आहे. यावर रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून असून दुपारी तीन नंतर कागदे हे पक्षाची भूमिका पदाधिकार्यांसमोर स्पष्ट करतील. तत्पूर्वी पप्पू कागदे यांनी पक्षाची विचारधारा लोकांसमोर घेऊन जा, एकीच्या बळाला महत्व द्या, असं आवाहन केलं. दुसरीकडे रिपाइंचे सर्वेसर्वा खा. रामदास आठवले हे बीड जिल्हा दौर्यावर येत असून त्या दौर्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. सदरच्या बैठकीला अविनाश जावळे, किशोर कांडेकर, अरुण भालेराव, महादेव उजगरे, दीपक कांबळे, अरुण निकाळजे, सिरसाट सह आदी उपस्थित आहेत.