बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये काल वाजत-गाजत गणरायाला निरोप देण्यात आला. बीड शहरामध्ये कंकालेश्वर परिसरात विहिरीमध्ये गणरायांचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ग्रामीण भागातही शांततेमध्ये गणरायाला निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात श्रींना निरोप देण्यात आला.
बीड शहरामध्ये गणेशोत्सवा दरम्यान अनेक मंडळांनी विविध देखावे सादर केले होते. हे देखावे पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी असे. काल गणरायाला निगरोप देण्यात आला. विसर्जनासाठी कंकालेश्वर परिसरामध्ये नगरपालिका प्रशासनाने विहीर खोदली होती. या ठिकाणी सर्व गणपतींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जना दरम्यान ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहात श्रीला निरोप देण्यात आला आहे.