मी लढेल किंवा न लढेल, गेवराई पंडितुमक्तच पाहिजे, 1 ऑक्टोबरपर्यंत वेळ द्या -लक्ष्मण पवार
गेवराई (भागवत जाधव):
गेवराई विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी आपला निर्णय मागे घेत निवडणूक लढवावी, यासाठी हजारो समर्थकांनी आज पवारांच्या घरासमोर ठिय्या मांडला. समर्थकांमधील काहींनी तुम्ही उभे राहिले नाही तर घराचं तोंड पाहणार नाही, फाशी घेईल, इथच ठिय्या मांडून बसेल, असे आक्रमक आणि भावनीक वक्तव्य केले. या सर्वांच्या भावना लक्षात घेतल्यानंतर दस्तुरखुद्द आ. लक्ष्मण पवारांनी मी लढेल किंवा न ळैेल परंतु गेवराईमधून दोन्ही पंडितांच्या घरातला एकही सदस्य निवडून आला नाही पाहिजे, मला अंतिम निर्णयासाठी एक ऑक्टोबरपर्यंतची वेळ द्या, म्हणत लक्ष्मण पवारांनी भाजपासह पालकमंत्री यांच्यावर नाराजी व्यक्त केली. पवारांचे भाषण झाल्यानंतर संतप्त समर्थकांनी पवारांच्या कार्यालयावर असलेले भाजपाचे बोर्ड काढून फेकले. रस्त्यावरच्या पाट्या उपटून टाकल्या. पक्ष सोडा, तुतारी हातात घ्या नाहीतर अपक्ष लढा, पण निर्णय लवकर घ्या, अशी आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.
गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय परत घ्यावा या मागणीसाठी आज त्यांच्या समर्तकांनी त्यांच्या निवासस्थानासमोर आणि कार्यालयासमोर ठिय्या मांडला. अनेकांनी गहिवरून येत ‘तुम्ही निवडणूक लढा, तुम्ही केवळ फॉर्मवर सही करा, कुठेही प्रचारात येऊ नका, आम्ही तुम्हाला निवडून आणतो, असे म्हणत पाठबळ दिले तर काही उत्साही कार्यकर्त्यांनी तुम्ही निवडणूक लढविली नाही तर फाशी घेईल, घराचे तोंड पाहणार नाही, इथेच ठिय्या मांडून बसेल, असा गर्भीत इशारा आ. पवारांना दिला. आ. पवारांनी कार्यतकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीलाच त्यांनी मी जो घेतलेला निर्णय आहे तो तुम्हाला विश्वासात घेऊन घ्यायला हवा होता, ही माझी चूक होती, असे म्हणत आपण सत्तेतले आमदार असताना महायुतीचे सरकार आल्यापासून आपल्या कामांना महत्व दिलं जात नाही. पालकमंत्री जाणीवपुर्वक आपल्या विरोधकांच्या नावे कामे टाकतात.
आपला पक्षही आपल्या मागणीकडे लक्ष देत नाही. अशी नाराजी व्यक्त करत तुमच्या सर्वांच्या भावना लक्षात घेऊन मला 1 ऑक्टोबरपर्यंत वेळ द्या, मी माझा निर्णय सांगतो. परंतु गेवराईमधून मी लढेल किंवा न लढेल, दोन्ही पंडितांच्या घरातला एकही सदस्य निवडून येता कामा नये याची शपथ घ्या, असे पवारांनी म्हटले. पवारांच्या भाषणानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयावरील भाजपाची पाटी उखडून फेकली. तुम्ही पक्ष सोडा, तुतारी हातात घ्या, नसता अपक्ष लढा, परंतु निर्णय लवकर घ्या, असं म्हणत आक्रोश केला.
काहीही झाले तरी दोन्ही पंडितांच्या घरातला एकही सदस्य निवडून येता कामा नये -आ. पवार
आक्रोश करणार्या समर्थकांसमोर बोलताना आ. लक्ष्मण पवारांनी अनेक विषयांना हात घातले. मी मोठ्या विचाराअंती निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हो, ही माझी चूकच आहे की हा निर्णय घेताना मी तुम्हाला विचारात घेतले नाही. ते घ्यायला हवे होते. परंतु तुम्ही अस्वस्थ व्हाल म्हणून तुम्हाला विचारले नाही. आपण गेल्या दहा वर्षांमध्ये मतदारसंघातले भरपूर कामे केले. कार्यकर्ते, तेवढ्याच ताकतीने माझ्या पाठीमागे उभे राहिले. परंतु आता गेल्या दोन वर्षांपासून आपले कामे अडवले जात आहेत, आपण जे कामे सुचवले त्याची मंजुरी विरोधकांच्या नावे दिली जाते. एखादा अधिकारी-कर्मचारी मागितला तर तो दिला जात नाही. करप्ट अधिकारी-कर्मचारी दिले जातात. पंचायत समितीमध्ये काय गोंधळ चालू आहे, वाळू माफिये उच्छाद् मांडत आहेत. आपण मागितलेल्या विकास कामांना बगल दिली जाते, सत्तेतला आमदार असताना माझ्या समित्या बरखास्त केल्या जातात, मी एखाद्याची तक्रार केली, भ्रष्टाचाराची तक्रार केली तर त्याला पालकमंत्री पाठिशी घालतात. या सर्व गोष्टींना आता मी कंटाळलो, पक्षही याकडे दुर्लक्ष करतो. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना मी मी सातत्याने निवेदने देतो, असो तुमच्यातला एखादा उमेदवार आपण उभा करू. परंतु कुठल्याही परिस्थितीत दोन्ही पंडितांच्या घरातला एकही सदस्य निवडून येता कामा नये. मी लढेल किंवा न लढेल पंडितांना निवडून येऊ द्यायचं नाही, मला 1 ऑक्टोबरपर्यंत वेळ द्या, मी त्या वेळेस तुम्हाला निर्णय देईल.