वडवणी (रिपोर्टर):- मराठा समाजाला सरसगट ओबीसी प्रवर्गातून कुणबी जातीचे आरक्षण मिळावे. या मागणीसाठी काही दिवसापासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. या उपोषणाच्या सन्मानार्थ आज बीड जिल्हा कडकडीत बंद ठेवण्याची हाक देण्यात आली होती. या हाकेला ओ म्हणत आज वडवणी शहर 100% कडकडीत बंद ठेवून जरांगे यांच्या उपोषणाला समर्थन दर्शविले आहे.
बीड जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने संपुर्ण बीड जिल्हा बंदाची हाक देण्यात आली होती. तसेच मनोज जरांगे पाटील हे संपुर्ण मराठा समाजाला सरसगट कुणीबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी काही दिवसांपासून अतरवली सराटी येथे उपोषण करत आहेत. सरकार समाजाची भूमिका घेत नसल्याचे दिसून येत असल्याने आज बंदाचा ठराव घेतला आहे. याला प्रतिसाद म्हणून अत्य आवश्यक सुविधा वगळता इतत्र अस्थापने 100% कडकडीत बंद ठेवण्यात आले आहेत. तर वडवणी पोलीसांनी रात्रीच आंदोलनकर्ते यांना समज देऊन शासनाच्या आदेशाचे पालन करावे असे सक्तीचे आदेश देण्यात आले असल्याने बंदाची रँली देखील काढण्यात आली नाही. यामुळे शहरातील शाळा आणि काँलेज तसेच दळणवळणाच्या सुविधा सुरुळीत सुरु आहेत. तर पोलीसांकडून देखील चोख बंदोस्त देण्यात आला आहे. शहरातील मुख्य चौकात पोलीसाचा पाहरा दिसून आला आहे. तर शहरातील व्यापारी वर्गाने देखील स्वंयफुर्तीने अस्थापने बंद ठेवून उपोषणाला पाठिंबा दर्शविला असल्याचे दिसून आले आहे.