सहा आरोपीविरोधात गुन्हा दाखल
बीड, (रिपोर्टर)ः-कोर्टात दाखल केलेली केस मिटवून का घेत नाही, तलाक का देत नाही या कारणावरून एका महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार पापनेश्वर नगर तेलगाव नाका परिसरात घडला. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून सहा आरोपी विरोधात पेठ बीडपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुस्कान सोहेल सय्यद (रा.ढगे कॉलनी पापनेश्वर गल्ली पेठ बीड) या महिलेने सासरच्या विरोधात कोर्टात केस दाखल केलेली आहे. केस पाठीमागे का घेत नाही व तलाक का देत नाही या कारणावरून मुस्कान हिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सय्यद सोहेल सय्यद चाँद, सय्यद चाँद झुंबर, सय्यद अफसाना बेगम, शेख फिरदोस (सर्व रा.फ्लॅट नं.56 हुरोना कॉलनी गंगाखेड नगर संभाजी नगर), सय्यद मुसा सय्यद हुसेन, मिना मुसा सय्यद (सर्व रा.लुकामसला ता.गेवराई जि.बीड) या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या यप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.