पुणे (रिपोर्टर): लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर बीडच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. या मोर्चामध्ये अनेकांचा सहभाग होता. शासनाच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
महाराष्ट्रात लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्यात यावे, वाहतूकदार, मुकादम यांचे कारखान्याकडील थकित रक्कम त्वरीद द्यावी, विमा रक्षण, कामगारांच्या कल्याणासाठीची रक्कम, शिष्यवृत्ती आणि स्थानीक पातळीवरील त्यांच्या समस्यांचे निराकरण हंगाम सुरू करण्यापूर्वी करण्यात यावे, या मागण्यांसाठी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालायावर ऊसतोड वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा सुभाष जाधव, आबासाहेब चौघुले, मोहन जाधव, अशोक राठोड, हिरामन तेलुरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यामध्ये अनेकांचा सहभाग होता.