नदी काठच्या गावकर्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन
केज, (रिपोर्टर)ः- तीन चार दिवसापासून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये संततधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मांजर धरण परिसरात पाण्याची आवक वाढली. हे धरण 96 टक्के भरले असुन या धरणाचे दोन दरवाजे आज उघडण्यात येणार आहेत.नदीकाठच्या नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मांजरा धरणामध्ये दररोज पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या तीन चार दिवसापासून जिल्ह्यासह व मराठवाड्यात संततधार पडत आहे. या पावसामुळे धरण परिसरात अधिकच पाणी आले आहे. हे धरण 96.5 टक्के भरले असुन या धरणाचे दोन दरवाजे 0.25 मि. उंची उघडण्यात येणार असुन या दरवजातून 1730 क्युसेसे (49.00 क्युमेक्स) एवढा पाण्याचा विसर्ग होणार आहे. दरवाजे उघडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या नागदीकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन मांजरा प्रकल्पच्या वतीने करण्यात आले आहे.