तो शेतकर्याचा मुलगा, त्याच्या एका हातात राष्ट्रवादीचे विचार तर दुसर्या हातात राष्ट्रवादीची पताका
बीड (रिपोर्टर): राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय शेख तय्यब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार आणि पताका हाती घेत विधानसभेची निवडणूक ताकतीने लढवण्याचे निश्चित केले. गेल्या तीन महिन्यांच्या कालखंडात बीड शहरातल्या घराघरात जावून पक्षाची भूमिका आणि विचार सांगत आता त्यांचा दौरा ग्रामीण भागाकडे वळला असून इथेही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद एका दिवसात मिळत नसतो. गेल्या वीस वर्षांपासून शेख तय्यब यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांचे प्रश्न मांडले आहेत. लोकांच्या सुख-दु:खात, विवाह कार्यात ते सातत्याने दिसून आले आहेत. त्यामुळे त्यांचा लोकसंपर्क आजही बीड विधानसभा मतदारसंघात अधिक दांडगा दिसून येतो. बीड विधानसभेसाठी राष्ट्रवादीला शेख तय्यब यांचा क्लिन चेहरा असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगामी विधानसभा निवडणुकीत हात बळकट करण्यासाठी शेख तय्यब हेच योग्य उमेदवार असल्याचे म्हटले जाते.
शेख तय्यब हा शेतकर्याच्या कुटुंबात जन्मलेला मुलगा. महाविद्यालयीन जिवनापासून चळवळ अन् अंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचा प्रभाव. त्यामुळे गेल्या 20 वर्षांपासून आपल्या दैनिकातून बीड विधानसभा मतदारसंघातलेच नव्हे तर जिल्हाभरातल्या सर्वसामान्य कष्टकरी, कामगार, शेतकर्यांसह दिन दुबळ्यांचे प्रश्न ते मांडत आले आहेत. सातत्याने सकारात्मक दृष्टीकोन आणि सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसांना मदत करण्याची वृत्ती, माणूस जोडण्याचे काम करत आले आहेत. गेल्या दोन दशकांपासून शेख तय्यब यांच्याकडे ना. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणूनही पाहिले जाते. या कालखंडात शेख तय्यब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार एका हातात आणि दुसर्या हातात राष्ट्रवादी काँग्रेसची पताका घेऊन त्यांनी पक्षहितासाठी आणि पक्षवाढीसाठी सातत्याने कार्य केले आहे. म्हणून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत जनतेतूनच राष्ट्रवादीचा उमेदवार हा शेख तय्यबसारखा असावा, असा सूर जेव्हा बाहेर पडू लागला तेव्हा गेल्या तीन महिन्यांच्या कालखंडात शेख तय्यब यांनी विधानसभा निवडणूक लढवण्या इरादे प्रकर्षाने काम सुरू केले. बीड शहरातल्या आठ हजार घरांमध्ये जावून त्यांनी पक्षाची भूमिका, विचार सांगितले. पंधरा दिवसांपासून ग्रामीण भागामध्ये त्यांचा दौरा सुरू आहे. या दौर्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. तो प्रतिसाद एका दिवसाचा नाही तर गेल्या वीस वर्षांच्या कालखंडात शेख तय्यब यांनी जोडलेली माणसे, केलेली कामे ही या प्रतिसादातून त्यांना पावती मिळत आहे. पत्रकारिता करताना मतदारसंघातले प्रत्येक प्रश्न मांडले आणि कुठलेही सत्ताकारण नसताना आलेल्या सर्वसामान्य माणसाचे काम ना. मुंडेंच्या माध्यमातून सोडवले. या त्याचंया कार्यपद्धतीला मतदारसंघात अधिक महत्व आहे. गेल्या वीस वर्षात शेख तय्यब यांनी एकही विवाह कार्य सोडलेले नाही. सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसाच्या सुख-दु:खात हा माणूस ताकतीने उभा राहत आलेला आहे. म्हणूनच आज राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जात-पात-धर्म-पंथापेक्षा कर्तव्य-कर्माला अधिक महत्व शेख तय्यब हे देत आले आहेत. मुस्लीम समाजामध्ये एक आपला माणूस म्हणून जेवढं पाहिलं जातं तेवढच अन्य समाजातही शेख तय्यब यांच्या कार्य पद्धतीबरोबर त्यांनाही आपलसं मानलं जातं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला प्रबळ उमेदवार म्हणून शेख तय्यब यांचे नाव सध्या बीड मतदारसंघात चांगलेच चर्चेत आहे. आता केवळ पक्षीय निर्णय बाकी आहे. एखाद्या मुरब्बी जुन्या जाणत्या आमदार, खासदाराने जेवढे मतदारसंघाचे दौरे केले नसतील त्यापेक्षा अधिक बीड विधानसभा मतदारसंघातल्या गावागावांत शेख तय्यब यांनी पक्षाचे विचार पोहचविले आहेत.