राष्ट्रवादीला जागा सुटली की तुमच्या मनातला उमेदवार देणार
माजलगाव, (रिपोर्टर)ः-महायुतीचं सरकार सर्व सामान्य, शेतकरी, युवक,महिला, बेरोजगार यांच्या हितासाठी काम करत आहे. लाडकी बहिण योजना सुरू केली. कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना पैसे दिले असे सांगत रात्री आता शेतकर्यांनी पिकांना पाणी देवू नये, त्यांनी आता निवांत झोपावे. शेतकर्यांना दिवसा लाईट दिली जाणार असल्याची ग्वाही देत हे सरकार शेतकर्यांचं आहे. आम्ही सर्व समाज घटकांचा विचार करून सर्वाच्या हिताचे निर्णय घेत असल्याचे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार करून उपस्थित राष्ट्रवादीच्या समर्थकांना दादा उद्देशून बोलले, माजलगावची जागा ही राष्ट्रवादीला बसून सोडविण्यात येईल आणि तुमच्या मनातला जो उमेदवार आहे त्यालाच उमेदवारी दिली जाईल. तर महायुतीतल्या वाचाळ वीरांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, मुस्लीम समाजावर जे वाचाळवीर बोलतात त्यांना विरोध करण्याची धमक आम्ही ठेवतो आणि विरोधही करतो. आम्ही जरी महायुतीत असलो तरी आम्ही चुकीच्या धोरणाला विरोध करू.
माजलगाव येथे राष्ट्रवादी काँंग्रेस जनसन्मान यात्रा आली होती. यानिमित्ताने आयोजित मेळाव्यात अजितदादा पवार बोलत होते. व्यासपिठावर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, आ.प्रकाश सोळंके, आ.काळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना अजितदादा पवार म्हणाले की, महिलांच्या हितासाठी आम्ही लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजने अंतर्गत तिसरा हप्ताही त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे. बेरोजगारांच्या हितासाठी या सरकारने उपक्रम राबवले असे सांगत ते पुढे म्हणाले की, शेतकर्यांना रात्री आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी त्रास सहन करावा लागत असे मात्र आता रात्री पिकांना पाणी देण्याची गरज नाही. दिवसात विज उपलब्ध करून दिली जाणार आहे. सौर ऊर्जा पंपासाठी 24 हजार करोड रूपयांची तरतुद करण्यात आली. 1 ऑक्टोबर पासून गायीच्या दुधाला 60 टक्के अनुदान संबंधित शेतकर्यांना मिळणार आहे. कापुस सोयाबीन उत्पादक शेतकर्यांचाही आम्ही विचार केला. त्यांच्या खात्यावर पैसे पडण्यास सुरूवात झाली. वारकर्यांनाही आमच्या सरकाने मदत केली. लोक कल्याणासाठी आमचं सरकार योजना राबवत आहे, कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेवून सर्व समाज घटकासाठी हे सरकार काम करत असल्याची ग्वाही देत हे सरकार शेतकर्यांचं सर्व सामान्याचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.
चौकट
तुमच्या मनामध्ये जो उमेदवार आहे त्याला उमेदवारी दिली जाईल
अजितदादा शेवटी बोलतांना म्हणाले की, माजलगावची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली तर तुमच्या मनामध्ये जो उमेदवार आहे. त्याला उमेदवारी दिली जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.