बीड, (रिपोर्टर)ः- नगर रोड ते तेलगाव नाका रोडचे चालू आहे. नगर नाका भागात चालु असलेल्या रोडच्या कामामध्ये नाली पासून तीन फुट अंतरावर विद्युत वितरण कंपनीचे पोल लावण्याचे अंदाज पत्रकात नमुद आहे. शिवाजी महाराज पुतळा ते पंचायत समिती जुनी इथपर्यंत नालीच्या तीन फुटांच्या बाहेर विद्यत वितरण कंपनीने पोल रोवले आहेत. मात्र चंपावती शाळेच्या बाजुला, नगर नाका येथे नालीच्या बाहेर पोल रोवण्यासाठी व्यापार्यांचे अतिक्रमण केलेले बांधकाम तोडावे लागतात म्हणुन चक्क या व्यापार्यांचें बांधकाम वाचविण्यासाठी एमएससीबीने ऐन नालीमध्ये पोल रोवले आहेत.
याबाबत या भागातील नागरीकांनी वेळोवेळी बांधकाम विभाग आणि विद्युत वितरण कंपनी यांना लेखी अर्ज, विनंत्या करूनही दोन्ही शासकीय विभाग याची दखल घेत नाहीत. या भागामध्ये व्यापार्यांची दुकाने आहेत. जुन्या पंचायत समिती भागामध्ये छोटी छोटी दुकाने रस्त्यावर येत असल्याने बांधकाम विभागाने ही अर्धीे दुकाने तोडली आणि नालीच्या बाहेर तीन फुटावर एमएससीबीचे पोल रोवले. मात्र चंपावती शाळेतील परिसराजवळ के.के कॉम्प्लेक्सच्या समोरच्या बाजुला ऐन नालीमध्ये हे पोल रोवले आहेत. याच बाजुने पाणी पुरवठा लाईनही जोडण्यात आलेली आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने व्यापार्याला पाठीशी घालण्याच्या नादात पडू नये आणि नालीच्या बाहेर तीन फुटाच्यापुढे पोल लावावेत अशी मागणी करण्यात येत आहे.
पोस्ट ऑफीसचे मिटर खाजगी दुकानात
बशीरगंज पोस्ट ऑफीसच्या नावाने नोंद असलेले मिटर के.के. प्लाझा समोरील एका पान टपरीच्या दुकानामध्ये लावण्यात आलेले आहे. याचा मिटर क्रं.07642259048 व ग्राहक क्रं.576010081679 असा असुन हे मिटर बशीरगंज पोस्ट ऑफीस नावे नोंदणीकृत असतांना पान टपरीच्या दुकानामध्ये लावण्यात आलेले आहे. पोस्टर ऑफीस आणि एमएससीबी या दोन्ही विभागाचा कारभार किती भोंगळा आहे हे यावरून स्पष्ट दिसून येते.