बीड (रिपोर्टर): राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. याचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यावर पडला आहे. पैसे काढण्यासाठी राष्ट्रीय बँकेसह पोस्ट कार्यालयात सकाळपासूनच महिलांची तोबा गर्दी असते. ज्या महिलांचे पैसे जमा झाले नाहीत आा महिला ऑनलाईन सेंटरमध्ये आपले पैसे का पडले नाही, याची माहिती जाणून घेत आहेत. पुढील दोन महिन्यांचे पैसेही या महिन्यामध्ये पडणार असल्याची घोषणा सरकारने केल्याने महिलांची दिवाळी चांगली होणार असल्याचे दिसून येत आहे.
राज्य सरकारने मध्य प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये दिले जात आहेत. यापुर्वी महिलांना एकत्रित दोन हप्ते देण्यात आले होते. त्यानंतर तिसरा हप्ता खात्यावर जमा झाला. पैसे काढण्यासाठी महिला राष्ट्रीय बँकेसह पोस्ट कार्यालयात सकाळपासूनच गर्दी करून आहेत. काही महिलांचे पैसे जमा झालेले नाहीत. ज्यांचे पैसे जमा झालेले नाहीत ते पैसे का जमा झाले नाहीत? त्यात काही त्रुटी आहे का? यााबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित महिला ऑनलाईन सेंटरमध्ये दिसून येत आहेत. पुढील दोन महिन्यांचे पैसेही या महिन्यात पडणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यंदाची दिवाळी महिलांसाठी आनंदाची ठरणार असल्याचे दिसून येत आहे.
मिनिमम बॅलेन्सच्या नावाखाली खात्याततून दोन-दोन हजार वजा
लाडक्या बहिणीचे पैसे बँक खात्यात आल्यानंतर कमीत कमी बॅलेन्स आणि संदेश सुविधा या नावाखाली राष्ट्रीयकृत बँकेने दोन दोन हजार रुपये यातून वजा केल्या आहेत. बँकेत केवायसी केल्यानंतर किंवा बॅलेन्स चेक केल्यानंतर तुमचे काम झाले आहे म्हणून बँकेचा कर्मचारी या महिलांना घरी पाठवतो मात्र आधार कार्ड, पासबुक व इतर कागदपत्र देऊनही या बँका दोन दोन महिने केवायसी करत नाहीत आणि मिनीमम बलेन्सच्या नावाखाली दोन दोन हजार रुपये वजा केले जातात. यालाही जिल्हा प्रशासनाने बँकेला लगाम लावावा, अशी मागणी होत आहे.