पात्रुड येथील दुर्देवी घटना
पात्रुड, (रिपोर्टऱ)ः- पाणी आल्यानंतर नळाला मोटर लावत असतांना विजेचा शॉक बसून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.ही दुर्देवी घटना पात्रुड येथे घडली आहे.या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेख गौस मुजीब हा 14 वर्षीय मुलगा पाणी आल्यानंतर मोटार लावत होता. यावेळी त्यालाविजेचा जबरदस्त शॉक सल्याने तो बेशुध्द पडला होता त्याला तात्काळ माजलगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यास डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या घटनेने पात्रूड येथे हळहळ व्यक्त होत आहे. शेख मुजी यांचा शेख गौस हा एकुलता एक मुलगा होता. शेख कुटूंबियांच्या दुःखात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.
स्वागताच्या बॅनर काढताना तरुणाचा मृत्यू
माजलगावातील घटना
माजलगाव, रिपोर्टर : शहरामध्ये लावण्यात आलेल्या स्वागताच्या बॅनर काढताना सदरील बॅनरचा वीज वाहक तारेला स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जनसामान्य यात्रा दिनांक एक ऑक्टोबर रोजी माजलगावात मंगलनाथ मैदानावर घेण्यात आली. या निमित्त स्वागतचे बॅनर माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यावर लावण्यात आले होते. यापैकी एक बॅनर माजलगाव धरणाच्या कमानी समोर पडल्यामुळे सदर बॅनर उचलून बाजूला ठेवत असताना गौतम सरपटे वय 25 वर्षे या युवकाचा लोम्बकळणार्या विजेच्या ताराला स्पर्श झाल्यामुळे विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला आहे ही घटना दिनांक 2 ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजता घडले आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.