बीड (रिपोर्टर): गेल्या दोन दिवसांपूर्वी भारतीय प्रशासन सेवेतील आदित्य जिवने यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्विकारल्यानंतर प्रत्येक दिवशी जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या 29 विभागांपैकी तीन विभागांची प्रत्येक दिवशी तपासणी करण्यात येणार आहे.
याबाबत काढलेल्या आदेशात प्रत्येक विभागाने आपल्याकडे असलेल्या योजना, मनुष्यबळाची संख्या, रिक्त पदाची माहिती, प्रलंबीत प्रस्ताव याबाबत छोटी बुकलेट पुस्तिका तयार करून प्रोजेक्टरवर त्याची माहिती सादर करावयाची आहे. नियमानुसार जे प्रस्ताव आहेत ते निकाली का काढण्यात आले नाहीत? आणि न्यायालयीन प्रकरणांची स्थिती याबाबतही आढावा घेण्यात येणार आहे. प्रलंबीत प्रकरणांमध्ये विनाकारण ठेवले असतील तर विभागप्रमुखावर कारवाईही करण्यात येणार आहे, असेही या आदेशात म्हटले आहे. काल त्यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी व अन्य एका विभागाचा आढावा घेतला आहे. सीईओंच्या या अॅक्शन मोडमुळे सर्व खातेप्रमुख कामाला लागले आहेत.