परळी, (रिपोर्टर)ः- गंगाखेड ते वडगाव रेल्वे स्टेशन दरम्यान वडगाव स्टेशन जवळ रेल्वे सिग्नचे वायर चोरट्याने तोडल्याने नागपुर, कोल्हापुर सिग्नल जवळ गाडी थांबली यावेळी चोरट्याने रेल्वेतील चार महिला प्रवाशांचे लाखो रूपयांचे दागिने लुटल्याची घटना 2 ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी रेल्वे ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपुर- कोल्हापुर गाडी नं.11403 या क्रमांकाची एक्सप्रेस रेल्वे गंगाखेड रेल्वे स्थानक ते वडगाव स्टेशन दरम्यान वडगाव रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे सिग्नल मिळाले नसल्याने सिग्नल जवळ थांबली. चोरट्यानी सिग्नलची तार तोडली व तसेच सिग्नलचे वायर तोडले. यामुळे रेल्वे सिग्नल जवळ थांबताच चोरट्याने डब्यात प्रवेश केला. रेल्वे सिग्नल जवळ का थांबली म्हणून वडगाव स्टेशनचे कर्मचारी सिग्नलकडे निघाले होते. याचवेळी चोरट्याने प्रवाशी डब्यातील चार महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटले. यात तीन महिला प्रवशांच्या गळ्यातील प्रत्येक 5 ग्रामचे मिळून असे एकूण 15 ग्राम व एका महिलेचे 8 ग्राम एकूण 23 ग्राम सोन्याचे दागिने पळवले. या प्रकरणी रेल्वे पोलिस ठाण्यात महिलांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव रेल्वे स्टेशनचे कर्मचारी यांनी चोरट्यांनी सिग्नल तार तोडलेल्या ठिकाणची तात्पुरती दुरूस्ती करून सिग्नल सुरू केले. त्यानंतर नागपुर- कोल्हापुर रेल्वे परळीकडे निघाली. घडलेली घडना परळी रेल्वे पोलिस ठाण्याला समजताच चोरट्यांच्या शोधासाठी पथक तैनात करण्यात आले. सिग्नल दुरूस्ती व पाहणीसाठी नांदेड येथून वडगाव स्टेशनला पथक आले होते.