बीड, (रिपोर्टर)ः- राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय शेख तय्यब यांनी बीड विधानसभा मतदारसंघातल्या ग्रामीण भागामध्ये मतदारांशी संवाद सुरू केला आहे.काल मोची पिंपळगाव याठिकाणी त्यांनी भेट दिली. यावेळी गावातील शेकडो नागरीकांनी उर्त्स्फुतपणे त्यांना दाद दिली. यावेळी एक कॉर्नर बैठक झाली. याबैठकीमध्ये गावातल्या विविध प्रश्नावर चर्चाही झाली.
संपादक शेख तय्यब यांनी गेल्या तीन महिन्यापासून बीड विधानसभा मतदार संघाचा दौरा सुरू केल आहे. त्यात त्यांना शहरासह गावा गावात उर्त्स्फृत प्रतिसाद मिळत आहे. काल शहरातील मासूम कॉलनी सह गांधी नगर भागातील नागरीकांची संवाद साधल्यानंतर सायंकाळी शेख तय्यब हे मोची पिंपळगाव या गावी मतदारांना भेटण्यासाठी गेले. शेख तय्यब हे गावात पोहंचताच गावकर्यांनी उर्त्स्फृत प्रतिसाद देत त्यांचे स्वागत केले. अल्पवेळात गावकर्यांनी कॉर्नर बैठकही आयोजित केली. याबैठकीत शेख तय्यब यांनी बीड विधानसभा मतदारसंघाचे व्हिजन मांडले. गावकर्यांनीही अनेक अडीअडचणी यावेळी शेख तय्यब यांच्या समोर मांडल्या. ठिक ठिकाणच्या दौर्यामध्ये शेख तय्यब यांना उर्त्स्फुत प्रतिसाद मिळत आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विश्वास नाना आखाडे यांच्या घरी भेट दिली. यावेळी गावचे सरपंच बाबुराव कोरडे, उपसरपंच बाळासाहेब आखाडे, बाबुराव खेत्रे, जालिंदर आखाडे, विजय आखाडे, बाळु कोरडे, रामेश्वर आखाडे आदी उपस्थित होते.