बीड, (रिपोर्टऱ)ः- मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भात शासन ठोस भुमिका घेत नाही. सरकारने योग्य ती भुमिका घ्यावी या मागणीसाठी आज मांजरसुंबा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतुक ठप्प झाली होती.
गेल्या अनेक महिन्यापासून मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबीत आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील हे संघर्ष करत आहेत. राज्य सरकार या बाबत योग्य ती भुमिका घेत नाही. आज मराठा-मुस्लिम-धनगर समाजाच्या प्रश्नासाठी मांजरसुंबा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. यावेळी डॉ.गणेश ढवळे, भागवत तावरे, निजाम शेख, बाळासाहेब मोरे, ह.भ.प. अनंद महाराज येडे, पाडुरंग आंधळे, रफिक पठाण, शंकर चव्हाण, मुकेश रसाळ, विक्की वाणी, बाळासाहेब मुळे, किशोर कांकर, मकसुद पहेलवान, बबलु सोनवणे, राहुल सोनवणे, सय्यद राजु भाई,खदीर पठाण, रेवण येडे, नितीन येडे, दत्ता येडे, सुनिल सोनवणे, संतोष वाणी, शहादेव कदम, राजाभाऊ माने, संभाजी कदम, विनोद जगताप, रंजित येडे, बंडू मांडवे, रामहरी चाळक, संजय मोरे यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.