मनोज जरांगे पाटलांनी मयताच्या कुटूंबियांचे केले सांत्वन
सरकारला आता मी सोडणार नाही-मनोज जरांगे पाटील
मराठा बांधवांनो टोकाचे पाऊल उचलू नका नाही तर मला माझे काम बंद करावे लागेल
बीड, (रिपोर्टर)ः- मराठा आरक्षणासाठी आतापयर्ंत अनेक तरूणानी आपले बलिदान दिले. बीड येथील एका चालकाने मराठा आरक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी घडली.या घटनेची माहिती मनोज जरांगे पाटील यांना झाल्यानंतर त्यांनी जिल्हा रूग्णालयामध्ये येवून मयताच्या कुटूंबियांचे सांत्वन केले. माध्यमांशी बोलतांना जरांगे यांनी आपला संताप व्यक्त करत सरकार फक्त जातीवाद आणि दंगली भडकवण्यातच मग्न आहे. समाजाच्या प्रश्नाशी त्यांना देणं घेणं नाही. आमचे बांधव एक एक करून आत्महत्या करत आहेत. मी आता हरामखोर सरकारला सोडणार नाही. असा गंभीर इशारा देत,माझी मराठा बांधवांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी असे कुठलेही टोकाचे पाऊल उचलू नये, मी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच आहे. नाहीतर मला काम बंद करावे लागेल असे ही त्यांनी यावेळी म्हंटले आहे.
नायगाव येथील अर्जून अंबादास कवटेकर यांनी आज जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या एका लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली. त्या चिठ्ठीमध्ये मराठा आरक्षणा संदर्भात उल्लेख आहे. त्यात म्हंटले आहे की, सर्व मराठा बांधवांना जय शिवराय… मनोज जरांगे पाटील हे एक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत. त्यांनी अनेकवेळा उपोषण केले. पण तरीही सरकारला काही फरक पडत नाही. मराठा आरक्षण सरकार गांभीर्याने घेत नाही. मराठा बांधवांना माझं सांगणं आहे की आपण त्यांची साथ दिली पाहिले. माझा एक खारीचा वाटा म्हणून मी माझा जिव देत आहे. याची सगळी जबाबदारी सरकारवर आहे. त्यांनी आम्हाला आरक्षण दिले असते तर मला हे पाऊल उचलावे लागले नसते. पण आता काही मला जगावे असे वाटत नाही याला तीन माणसे जबाबदार आहेत. ते म्हणजे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार अशा पध्दतीचा उल्लेख चिठ्ठीमध्ये आहे.दरम्यान या घटनेची माहिती मनोज जरांगे पाटील यांना झाल्यानंतर त्यांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात येवून कवटेकर कूटूंबियांचे सांत्वन केले. यावेळी माध्यमांशी बोलतांना जरांगे पाटील यांनी सरकार विरोधात आपला संताप व्यक्त केला. हे सरकार जातीयवाद आणि दंगली घडविण्यात पुढे आहे. त्यांना मराठा समाजाच्या वेदना कळत नाहीत. आतापर्यंत अनेक बांधवांनी बलीदान दिले आहे. या हरामाखोर सरकारला आपण आता सोडणार नसल्याचा इशारा देत मराठा बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की, त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये नाहीतर मी माझे काम बंद करेल असेही त्यांनी यावेळी म्हंटले आहे.