बीड, (रिपोर्टर)ः-बीड शहरामध्ये टवाळखोरांची संख्या वाढली हे टवाळखोर शाळा, महाविद्यालय, क्लासेस सह आदी ठिकाणी गोंधळ, धिंगाणा घालत असतात. कधी कधी येणार्या जाणार्या मुलींची छेड ही काढत असतात. अशा टवाळखोराविरोधात पोलिस प्रशासनाने कारवाई करण्यात सुरूवात केली. आज सकाळी शिवाजी नगरपोलिसांनी विविध ठिकाणाहून 15 ते 20 जणांना ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुली-महिलांची छेडछाड रोखण्यासाठी पुर्वी चिडीमार पथकाची स्थापना करण्यात आली होती. हे पथक 24 तास सक्रीय असायचे या पथकाने अनेक टवाळखोरांना चांगलीच अद्दल घडवली होती. सदरील पथक चांगलेच चर्चेत आले होते. मात्र त्यानंतर अनेक पथके स्थापन करण्यात आले. पण त्या पथकांनी तशा कारवाया केल्या नाहीत. शहरात टवाळखोर आणि रोड रोमिओंची संख्या वाढली. हे टवाळखोर शाळा, महाविद्याल, कोचिंग क्लासेस परिसरात गोंधळ घालतात, वेगाने गाड्या पळवतात, हॉर्न वाजवतात, मुलींची छेड काढतात अशा विरोधात पोलिस प्रशासन कारवाई करत नव्हते. आता पोलिसांनी टवाळखोरा विरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली. आज सकाळी शिवाजी नगर पोलिसांनी विविध ठिकाणाहून 15 ते 20 जणांना ताब्यात घेतले आहे.