बीड, (रिपोर्टर)ः- परळी तालुक्यातील शिराळा ग्रामपंचायतचे कर्मचारी गेल्या 15 दिवसापासून ग्रा.पं. कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहेत. त्यांचे थकीत आणि चालु वेतन प्रशासनाने दिले नाही. वेतनासाठी 15 दिवसापासून त्यांना आंदोलन करण्याची वेळ आली. सध्या दिवाळी तोंडावर आलेली आहे असे असतांनाही कर्मचार्यांना पगार मिळत नसल्याने कर्मचार्यात शासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
शिराळा ग्रामपंचायत अंतर्गत अनेक कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचार्यांचा काही महिन्यांचा पगार थकलेला आहे. चालु पगार ही कर्मचार्यांना मिळाला नाही. पगारसाठी कर्मचार्यांनी अनेकवेळा प्रशासनाकडे मागणी केली. मात्र प्रशासन त्यांना पैसे देत नसल्याने गेल्या 15 दिवसापासून हे कर्मचारी ग्रा.पं कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहेत. जो पर्यंत योग्य निर्णय होतता नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय कर्मचार्यांनी घेतला आहे. येत्या काही दिवसात दिवाळी आली असुन याचा विचार प्रशासकीय अधिकार्यांनी करून कर्मचार्यांचे वेतन द्यावे अशी मागणी केली जात आहे.