पुण्यात परळीकर नागरिकांच्या कौटुंबिक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे (रिपोर्टर): राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत पुणे शहरातील जंगली महाराज रोडवर असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरात परळी मतदारसंघातील विद्यार्थ्यांसह वास्तव्यास असलेल्या कुटुंबियासोबतचा संवाद मेळावा सुरू झाला असून या मेळाव्याला आ. धनंजय मुंडे संबोधित करत आहेत. मेळाव्यास विद्यार्थ्यांसह अनिवासी परळीकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली आहे. धनंजय मुंडे यांचे सभागृहात इन्ट्री होताच परळीकर विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत ‘आता कसं धनुभाऊ म्हणतील तसं’ चा निनाद केला. पुण्यातील हा मेळावा संपल्यानंतर सायंकाळी आळंदी येथे असाच मेळावा घेतला जाणार आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली तसे ना. धनंजय मुंडे यांनी आपल्या शिस्तबद्ध प्रचाराला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे. ना. मुंडे हे निवडणुकीला सामोरे जाताना शेवटच्या मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे शहरामध्ये परळी विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांसह अनेक कुटुंब वेगवेगळ्या कामानिमित्त वास्तव्यास आहेत. अशा विद्यार्थ्यांसह कुटुंबीयाशी संवाद साधण्यासाठी पुणे शहरातील जंगली महाराज रोडवर असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरात मेळावा ठेवण्यात आला आहे. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत असून बालगंधर्व रंगमंदिर भरून गेले आहे. उपस्थित अनिवासी परळीकरांसोबत ना. मुंडेंनी संवाद साधून आपली जन्मभूमी असलेल्या परळी मतदारसंघाच्या सर्वांगीन विकासाची परंपरा खंडीत न होऊ देण्यासाठी पुन्हा एकदा पाठिशी उभा राहण्याचे आवाहन केले. अनेक विद्यार्थ्यांच्या आणि वास्तव्यास असलेल्या कुटुंबियांच्या अडीअडचणी जाणूस घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न ना. मुंडेंनी या वेळी केला. पुण्यातील मेळावा संपल्यानंतर ना. मुंडे थेट आळंदी येथे जाणार असून तेथेही विद्यार्थ्यांसह त्या परिसरात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांसोबत चर्चा करणार आहेत.