बीड, (रिपोर्टर)ः- रोजगार हमी योजने अंतर्गत कामे पाहण्यासाठी व मस्टर काढण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रत्येक गावात एक ग्राम रोजगार सेवक आहे. त्यांचे मानधन गेल्या दिड वर्षापासून प्रलंबीत होते. निवडणूका घोषीत होण्या आधी त्यांच्या मानधनाबाबत शासनाने निर्णय घेतला. ग्रामरोजगार सेवकांना दिवाळीच्या सणाला पैसे मिळणार आहेत. बीड तालुक्यात 176 ग्रामपंचायती असुन 129 ग्रामपंचायतीच्या ग्रामरोजगार सेवकासाठी 14 कोटी 41 लाख 636 रूपये आले आहेत. दिवाळी सणाच्या तोंडावर ग्रामरोजगार सेवकांना पैसे आल्याने ग्रामरोजगार सेवकांची दिवाळी गोड होणार आहे.
बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्राम रोजगार हमी योजनेची कामे होतात. ही योजना गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. केंद्र सरकारच्या वतीने ही योजना राबविली जाते. प्रत्येक गाव पातळीवर योजनेच्या अंमलबजावणीसाठी व मस्टर काढण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या ग्रामरोजगार सेवकांचे 15 महिन्याचे मानधन रखडले होते. निवडणूका घोषीत होण्याच्या आधी ग्रामरोजगार सेवकांना खुश करण्याचे काम शासनाने केले. बीड तालुक्यातील 129 ग्रामपंचायतीच्या ग्रामरोजगारांसाठी 14 कोटी 41 लाख 636 रूपये आले आहेत. दिवाळीच्या पुर्व संध्येला पैसे आल्याने ग्रामरोजगार सेवकात आनंद व्यक्त केला जावू लागला आहे.
चौकट
47 ग्रामरोजगार सेवकांचे पैसे आले नाहीत
ग्रामरोजगार सेवकांचे मानधनासाठी त्यांचे विविध कागदपत्र आणि ग्रामपंचायतीचा ठराव रोहयोच्या वेबसाईटवर अप्लोड करावा लागत असतो. तालुक्यातील 47 ग्रामरोजगार सेवकांचे कागदपत्र संबंधित विभागाकाडे अप्लोड झाले नसल्याने त्यात काही त्रुटी असल्याने त्यांचे पैसे आले नाहीत.
चौकट
ग्रामरोजगार सेवकाचा ग्रामरोजगार सहाय्यक झाला
ग्रामरोजगार सेवक हे पदनाम बदलण्यात येवून त्याऐवजी ग्रामरोजगार सहाय्यक असे पदनाम बदलण्यात आले आहे. तसा जीआर शासनाच्या वतीने काढण्यात आला आहे.