काही शिक्षक फक्त हजेरी टाकून निघून जातात
विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान,वरिष्ठांनी कामचुकार शिक्षकावर कारवाई करावी
नेकनूर, (रिपोर्टर)ः- नेकनूर येथील शासकीय अध्यापक विद्यालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला असून या ठिकाणचे शिक्षक व्यवस्थीतपणे काम करत नाहीत. काही शिक्षक फक्त हजेरी टाकून निघून जातात. शिक्षका अभावी विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होवू लागले. आज सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी अध्यापक विद्यालयाची पाहणी केली असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. याची दखल शिक्षण विभागाने घेवून दांड्या मारणार्या शिक्षका विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
नेकनूर येथे अध्यापक विद्यालयात अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात. या महाविद्यालयातील काही शिक्षक दांड्या मारतात. रजिस्टवर हजेरी करून ते सरळ निघून जात आहेत. मराठी आणि उर्दू दोन्ही विभागाचे विद्यार्थी अध्यापक विद्यालयात शिक्षण घेत आहेत. आज नेकनूरचे सरपंच सुंदर लांडगे, बाबूभाई शिवाजी शिंदे, अशोक शिंदे, पत्रकार अमजद पठाण यांनी स्टिंग ऑपरेशन केले असून त्यांनाहा प्रकार निदर्शनास आला. याची दखल शिक्षण विभागाने न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामपंचायतने दिला आहे.