बीड/परळी (रिपोर्टर): ‘निधड्या छातीचा, बीडच्या मातीचा लावला कपाळी टिळा गावागावांत गाजतय, धनुभाऊचा नाद खुळा’ आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी प्रचारासाठी तयार केलेलं गीत परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यात धुमाकूळ घालत असून प्रत्येकाच्या ओठावर आपल्या सोबतीला डीएम हवा’ हे बोल ऐकावयास मिळत आहे. सदरचे गीत हे वडवणी येथील तिरुपती ग्रुप ऑफ बिझनेसच्या चार तरुणांनी केलं आहे. तर सदरचे गीत हे सुहास मुंडे यांनी लिहिलं आहे.
परळीसह जिल्ह्यात आपल्या कर्तृत्व कर्माने कायम दबदबा निर्माण करून सोडणारे राज्याचे कृषीमंत्री तता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी वडवणीच्या चार तरुणांनी ‘सोबतीला डीएम हवा’ हे गीत तयार केलं. वडवणी येथीलच सुहास मुंडे, अमर जाधव, अभी शिंदे, गोरख झाडे, मुनगेश मुंडे यांचा तिरुपतीत ग्रुप ऑफ बिझनेस नावाचा एक ग्रुप आहे. त्यांनी हे गाणं केलं आहे. गाण्याची सुरुवात दस्तुरखुद्द धनंजय मुंडेंच्या एका रेकॉर्डेड शब्दाने केली आहे. ‘धनंजय मुंडे याला डीएम म्हणतात’, हा तो शब्द. पुढे ‘निधड्या छातीचा…बीडच्या मातीचा लावला कपाळी टिळा, गावागावांत गाजतोय धनुभाऊचा नादच खुळा’ हे गाणं मतदारसंघात नव्हे तर जिल्ह्यात आणि राज्यातल्या बहुतांशी भागात चांगलच व्हायरल होताना दिसून येत आहे.