बीड, ( रिपोर्टर)ः- विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे.85 व त्यापुढील वयोगटाच्या मतदारांना आणि दिव्यांगांना घर बसल्या मतदान करता येणार आहे. या मतदानाला आज पासुन सुरूवात झाली. आज आणि उद्या असे दोन दिवस सकाळी 7 ते सायं. 5 वाजेपर्यंत मतदान करता येणार असुन बीड तालुक्यात 307 मतदारांची नोंदणी करण्यात आली. हे मतदान करून घेण्यासाठी निवडणुक विभागाने 22 पथकाची नियुक्ती केलेली आहे. वयोवृध्द आणि दिव्यांगांना घर बसल्या मतदान करता येणार आहे.
विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या मतदानापुर्वी 85 व त्या पुढील वयोगटासाठी आणि दिव्यांगासाठी आज व उद्या सकाळी 7 ते सायंकाळी 5 या दरम्यान मतदान करता येणार आहे. घरोघरी जावून निवडणुक विभागाचे कर्मचारी मतदान करून घेणार आहेत. आज सकाळपासुन मतदानाला सुरूवात झाली. 307 जणांची नोंदणी करण्यात आलेली आहे.