माजलगाव (रिपोर्टर): माजलगाव शहरात शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकानाचे शटर तोडून चोर्या केल्या.यात चोरट्यांनी सर्व दुकानातून जवळपास तीन लाख रुपयांच्या रोकडसह दुकानातील किराणा माल चोरून नेल्याची घटना घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की,बायपास रोड येथील खुरपे यांच्या दीपाली एजन्सी या दुकानातून रात्री एक वाजण्याच्या दरम्यान रोख रक्कम चोरून नेली. यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा जुना मोंढा येथे वळवला. या ठिकाणी चोरट्यांनी अनमोल किराणा दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला व गल्ल्यात असलेले दोन लाख रुपये व दुकानातील काही किराणामाल चोरून नेला. यानंतर चोरट्यांनी दीपक शिनगारे यांच्या मोंढयात असणार्या शुभम ट्रेडर्स या किराणा दुकान फोडले.दुकानातील गल्ल्यात असलेले 35 हजार रुपये रोख व दुकानातील ड्राय फूड किराणा सामान चोरून नेले. यानंतर चोरट्यांनी कृष्णा कानडे यांची दूध डेरीतील नगदी 15 हजार रुपये व इतर वस्तू चोरून नेल्या. या सर्व चोर्या दोन चोरट्यांनी मोटरसायकल वर येऊन केल्याची माहिती आहे.दरम्यान पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.