बीड, (रिपोर्टर)ः-राजकीय दृष्टया अतिसंवेदशिल समजल्या जाणार्या बीड विधानसभा मतदारसंघात प्रचार मध्यान टप्प्यात पोहंचला आहे. रोज वेग वेगळ्या राजकीय घडामोडी घडत असल्याने दोन प्रमुख उमेदवारांना अपक्ष उमेदवारांचे आवाहन वाढत चालले आहे. तिसर्या आघाडीच उमेदवार कुंडलिक खांडे यांनी बीड शहरा पाठोपाठा आता वाडी, वस्ती, तांड्यासह बालाघाटावर आपले बस्तान बसविल्याचे निदर्शनास येत असून क्षीरसागर मुक्तीसाठी आता मतदारच एकत्रित येत खांडेंचे वजन वाढवत असल्याचे दिसून येवू लागले आहे.
बीड मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीकडून क्षीरसागर बंधू एकमेकांविरोधात उभे आहेत. अशा स्थितीत अपक्षही आता केवळ क्षीरसागर मुक्तीच्या नार्यावर प्रचारात आघाडी घेवून आहेत. तिसर्या आघाडीचे उमेदवार कुंडलिक खांडे यांनी बीड शहरासह वाडी, वस्ती, तांड्यावर प्रचार शिगेंला नेत मतदारांच्या दारात जावून प्रस्थापितांविरोधात माझ्या सारख्या सर्व सामान्य शेतकर्याच्या पोराला विधानसभेत पाठवा असे आवाहन करत आहेत. त्यांच्या आवाहनाला ठिक ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत आहे. काल बालाघाटावर कुंडलिक खांडे यांनी बैठक बोलविली मात्र त्या बैठकीचे स्वरूप जाहिर सभेत झाल्याने बालाघाटावरचा मतदार पर्याय शोधत असल्याचे दिसून आले. तो पर्यात कुंडलिक खांडे हाच असल्याचे उपस्थित मतदारांनी चर्चेतून सांगून टाकले. मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत सातत्याने काम करत राहिलेला हा उमदा तरूण समाजाच्या नेतृत्वाचा चेहरा होवू शकतो असे स्पष्टपणे मतदारातूनच बोलावून दाखविले जात आहे. एकीकडे जरांगे पाटील यांनी अपक्षांना मतदान करू नका असे जाहिर आवाहन केले आहे. मात्र कुंडलिक खांडे हे तिसर्या आघाडीचे उमेदवार असून ते मराठा आंदोलनात सक्रीय आहेत. जरांगे पाटलांचा आदेश अपक्षांसाठी आहे मग पर्याय आपल्याला कुंडलिक खांडे हाच असल्याचे मराठा समाजात बोलून दाखविण्यात येत आहे. दुसरीकडे मुस्लिम समाजाला महायुतीला अथवा त्यांच्या उमेदवाराला मतदान करायचे नाही अशा वेळी पर्याय म्हणून अपक्ष कुंडलिक खांडेकडे पाहितलं जात असल्याचे संागण्यात येते. म्हणुनच सध्या बालाघाट ते वाडी, वस्ती, तांडा कुंडलिक खांडेंचा झेंडा ही घोषणा जोर धरतांना दिसत आहे.