तरुण म्हणाला, हे चुकीचे, आम्ही तुम्हाला निवडून दिले, मुंदडांची बोबडी वळाली, म्हणाले मी पोलिसांना बोलवले नाही
मुंदडांच्या दाबदडपीविरोधात मतदार संघात उठला आवाज
महायुतीचा उमेदवार अडचणीत
केज (रिपोर्टर): गेली पाच वर्षे ज्या हिडीस पद्धतीने मतदारांना वागवले आणि आता पुन्हा गावागावात मतं मागायला निघाले, तेव्हा मतदारांनी थेट आमदार मुंदडांच्या सासरे बुवांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. मतदारांच्या तिखट प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी आमदाराच्या सासर्याने थेट पोलीस बोलवल्यानंतर मतदारात असंतोष पसरला आणि मतदारांनी काकाजी हे चुकीचे आहे, आम्हाला त्रास देऊ नका, आम्हाला त्रास देणं चुकीचे आहे, असे म्हणत चांगलेच झापले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सदरची घटना ही मौजे मगरवाडी ता. अंबाजोगाई येथे घडली आहे.
सत्तङेची धूंदी डोक्यात शिरल्यानंतर तो व्यक्ती कसा वागतो, याचं ज्वलंत उदाहरण केजच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या कुटुंबियाकडे पाहिल्यानंतर दिसून येतं. गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात मुंदडा कुटुंबियांकडून मतदारसंघातल्या सर्वसामान्य नागरिकांना अनेक वेळा त्रास दिल्याचे समोर आले आहे. आंदोलन असो, न्याय हक्काच्या मागणीसाठी घरासमोर केलेला ठिय्या असो अथव मराठा समाजाने व्यक्त केलेल्या भावना असो, त्या त्या ठिकाणी मुंदडा कुटुंबियाने वेळोवेळी मतदारसंघातल्या मतदाराचीं वेळोवेळी अवहेलना केली आहे. आता पुन्हा मुंदडा निवडणूक रिंगणात असल्याने मतं मागण्यासाठी आमदार मुंदडांचे पतीदेव आणि सासरेबुवा गावागावात फिरत आहेत. अशा वेळी या पाच वर्षामध्ये विकासाची साधी वी ही न मांडल्याने लोक जाहीर सवाल करू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी आमदार मुंदडांचे सासरे बुवा अंबाजोगाई तालुक्यातील मगरवाडीत प्रचारासाठी गेले होते. त्याठिकाणी तेथील तरुणांनी काही सवाल उपस्थित केले. त्यावेळी नंदकिशोर मुंदडा यांनी गावात तत्काळ पोलीस बोलवले. त्यामुळे तरुणांच्या संतापाचा भडका उडाला आणि ते म्हणाले, काकाजी हे चुकीचे आहे. काकाजी आम्ही तुम्हाला आधी निवडून दिले, आम्हाला त्रास देणे चुकीचे आहे. अचानक तरुणांचा मोठा घोळका गाडीसमोर गोळा झाला त्यावेळी मुंदडा यांनी ‘मी पोलीसांना बोलवलं नाही, मी शपथ घेऊन सांगतो, माझे मोबाईल बघा, निवडणूक ही दोन दिवसाची आहे’ अशी सारवासारव केली मात्र मुंदडाचंया वर्तवणुकीचा आणि निष्क्रीयतेचा फटका या वेळेस महायुतीच्या उमेदवाराला बसणार असल्याचे यावरून दिसून येते.