बीड (रिपोर्टर): पराभव झालेला असला तरी पुन्हा आम्ही जनतेत जाऊ, पुन्हा लढू आणि पुन्हा जिंकू असा आत्मविश्वास बाळगत बीड विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणारे महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांनी आपल्या सोबत 95 हजारापेक्षा जास्त मतदारांनी विश्वास टाकला आहे. येणार्या काळात निष्क्रीय आमदारामुळे विकासाला नक्कीच खिळ बसेल परंतु राज्यात महायुतीचे सरकार आले आहे, त्यामुळे बीड शहरासह मतदारसंघातले रस्ते, सिंचन यासह अन्य मुलभूत गरजा असणारे विकासाभिमुख काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
डॉ. योगेश क्षीरसागर व डॉ. सारिका क्षीरसागर या दाम्पत्याने आज पत्रकार परिषद घेत पुढील पाच वर्षाचे आपले व्हिजन सांगितले. डॉ. क्षीरसागर म्हणाले, कालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपला काही मतांनी पराभव झाला. मात्र 95 हजारापेक्षा जास्त मते आपल्याला पडले आहेत. लोकांचा आपल्यावर विश्वास आहे, दुर्दैवाने गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात ज्या आमदाराने काही केले नाही तो निष्क्रीय आमदार पुन्हा एकदा निवडून आला आहे, त्यामुळे विकासाला खिळ बसेल, परंतु राज्यात महायुतीचे सरकार आले आहे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी या मतदारसंघात जास्तीत जास्त निधी देण्याचे म्हटले आहे. दादांनीतुम्ही जरी पराभूत झालेले असले तरी तुम्हाला विकासासाठी भरपूर निधी देण्यात येईल, हे कामे करताना भविष्यात नक्कीच अडथळे निर्माण होऊ शकतात, मात्र त्यावरही उपस्थित जनतेच्या सानिध्यातून मार्ग काढू. येणार्या स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुर्ण ताकतीने लढू, कार्यकर्त्यांना तेवढी ताकद देऊ, आता आमचं कुटुंब एक झालं, सक्षमपणे उद्याच्या निवडणुकीला सामोरे जाऊ, असेही डॉ. योगे क्षीरसागरांनी म्हटले.