केज । सय्यद माजेद
मोठा गाजावाजा करत केज नगर पंचायत जनविकास आघाडीच्या ताब्यात आली. निवडणुका होवून अनेक महिने उलटले मात्र अद्यापही केज शहराच्या विकासाच्या पाळणा हलेना. जे पुर्वी प्रश्न होते तेच प्रश्न आज कायम आहे. निधी आणण्यात लोक प्रतिनिधी अपयशी ठरवू लागले. रस्ता, नाल्या, पाणी प्रश्न, स्वच्छता या बाबत नागरीकांना संघर्ष करण्याची वेळ येवू लागली आहे. अस्वच्छतेमुळे अनेक ठिकाणी रोगराई पसरू लागली. केज शहर भकास होत असल्याचे दिसून येवू लागले.
केज शहराचा विकास करु असे मोठ मोठे दावे जनविकास आघाडीच्यावतीने करण्यात आले होते. शहर वासीयांनी जनविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला. निवडणुका झाल्यानंतर काही तरी बदल होईल असं वाटत असतांना अजून तरी कुठलेही प्रश्न नगर पंचायतीकडून सुटलेले नाही. शहराचे लोकसंख्या जवळपास 40 हजार आहे. या लोकांसाठी ज्या नागरीसमस्या असतात त्या सोडवणे गरजेचे आहे. पाण्याच्या बाबतीत नगर पालीका सक्षम नाही. अस्वच्छतेमुळे रोगराई पसरु लागली. अनेक ठिकाणी नाल्या व्यवस्थीत नाही. एकूणच नगर पालिका विकासाच्या बाबतीत फेल ठरली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. न.प.कडून मोठी उम्मेद होती पण या उमेद्दीवर पाणी पडू लागले.