बीड (रिपोर्टर) देशभरात हिंदू समाजावर होणार्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज बीड शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने मुकमोर्चा काढण्यात आला. हा मुकमोर्चा बालाजी मंदिर येथून सहयोगनगर येथील गणेश मंदिर परिसरापर्यंत गेला. त्याठिकाणी मोर्चाची सांगता झाली. या वेळी हिंदू समाजावर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, अशी भावना मोर्चेकर्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, झारखंड, कर्नाटक, दिल्ली या राज्यांमध्ये हिंदूंची हत्या करण्यात आली. या घटनानंतर भावना व्यक्त करण्यास शब्द नाहीत, असं म्हणत सकल हिंदू समाजाने काल्या फिती बांधून मुकमोर्चा काढला. बीडमधील या मोर्चाच्या माध्यमातून हिंदू समाजावर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला. या मोर्चात अनेक हिंदू सहभागी झाले होते.