बीड, (रिपोर्टर)ः- जिल्हा रूग्णालयाच्या आवारात पुर्वी वाहने लावली जात होती. मात्र या वाहनामुळे रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना येण्या जाण्यासाठी अडचणी येत होत्या. रूग्णालय प्रशासनाने वाहने बाहेर लावण्याची सक्ती केली. त्यासाठी पार्कींग व्यवस्था केली. त्या ठिकाणाहून गाड्या चोरीला जावू लागल्या. शनिवारी एका व्यक्तीची गाडी चोरीला गेली. सदरील चोरटा सीसीटिव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाला. या चोरट्यास पोलीस पकडतील का कारण यापुर्वी अनेक गाड्या रूग्णालय परिसरातून चोरीला गेलेल्या आहेत. त्यातील बहुतांश गाड्यांचा अद्याप पत्ता लागलेला नाही.
रामधारू प्रभाळे(रा. पेठ बीड) यांचे वडील जिल्हा रूग्णालयात अॅडमिट असल्याने ते शनिवारी त्यांना भेटण्यासाठी आले होते. प्रभाळे यांनी आपली मोटार सायकल क्रं. एम.एच.23.आर.3829 ही रूग्णालयाच्या नवीन पार्कींगमध्ये उभी केली. सदरील मोटारसायकल चोरट्याने चोरून नेली. तेथील सीसीटिव्ही कॅमेरा बघीतला असता. त्यामध्ये चोरटा दिसून येत आहे. तो एकटाच नव्हे तर अन्य साथीदार त्याच्या सोबत आहेत. एक महिला देखिल यात सहभागी असल्याचे दिसून येत आहे. कारण चोरटा व इतरांचे संभाषण होत असल्याचे या कॅमेर्यामध्ये स्पष्ट दिसून येत आहे. या प्रकरणी प्रभाळे यांनी शिवाजी नगर पोलिसात तक्रार दाखल केली. या चोरट्याचा शोध लावण्यास पोलीसांना यश येईल का. यापुर्वी अनेक गाड्या रूग्णालय परिसरातून चोरीला गेलेल्या आहेत. त्या गाड्यांचा शोध लागलेला नाही.