वडवणी (रिपोर्टर):- मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निघृणपणे खून करण्यात आला आहे. या घटनेला साधारण तीन ते चार दिवस झाले आहेत. हि घटना अतिशय नंदनीय असून ह्हदय पिळवणारी देखील आहे.या घटनेच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला आहे या बंदला देखील व्यापार्यांचा शंभर टक्के पाठिंबा देत आर्थिक व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे.
याबाबत आधिक माहिती अशी कि, मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निघृनपणे खून करण्यात आला आहे. या घटनेन जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा जाहिर निषेध करण्यासाठी व यातील संपुर्ण आरोपीचा शोध घेण्यात यावा, या प्रकरणातील मास्टरमांईंड कोण याचा देखील पोलीसानी तपास करावा. आरोपीवर कठोर शासन करुन फाशी देण्यात यावी या मागणीसाठी आज वडवणी तालुका मराठा सकल समाजाच्या वतीने शहर बंदाची हाक देण्यात आली आहे. याला व्यापाऱ्यानी देखील शंभर टक्के प्रतिसाद देत आर्थिक व्यवहार बंद ठेवत पाठींबा दर्शविला. आज सकाळी सकल मराठा समाजाजाच्या तरुणांनी शहरात रँली काढत बंदाचे आव्हान करत घोषणा देण्यात आल्या. शहर बंद ठेवण्यात आले असल्याने जनजवीन विस्कळीत झाले आहे. तर व्यापाऱ्याने स्वंयफुर्तीने बंद ठेवल्याने अगदी शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.तर या मागणीचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने वडवणी तहसिलदार यांना देखील निवेदन देण्यात आले आहे.