नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली च्या व्यवस्थापकांसोबत आढावा बैठक
अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, येवतमाळ जिल्हा कार्यालयांना प्रत्यक्ष भेट
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करा
शैक्षणिक कर्जाला अनन्य साधारण महत्त्व द्या
लोकांची अडवणूक करू नका : शेख तय्यब यांच्या व्यवस्थापकांना सूचना
बीड(प्रतिनिधी ):-
मराठवाड्यातील जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक महामंडळाचे संचालक शेख तय्यब यांनी विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, गडचिरोली सह अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, येवतमाळ येथील जिल्हा कार्यालयांना भेट देत तेथील व्यवस्थापकांसोबत बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला. उपस्थित व्यवस्थापकांना महामंडळामार्फत मिळणार्या वेगवेगळ्या योजनांबाबत जनजागृती करण्याबाबत आणि विशेष करून शैक्षणिक कर्जासाठी लक्ष देण्याबाबत सूचना केल्या. विदर्भातील बहुतांशी कार्यालयात कर्मचार्यांना काही अडचणी आहेत याबाबतच्या तक्रारी कर्मचार्यांनी केल्या. त्यावर शेख तय्यब यांनी महामंडळाचे एम.डी.मगदूम साहेब यांच्यासोबत चर्चा करून त्या समस्या सोडविण्याबाबत सूचना केल्या. शेख तय्यब यांची मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक महामंडळाच्या संचालक पदावर नियूक्ती झाल्यापासून त्यांनी जवळपास 25 जिल्हा कार्यालयाला भेटी दिल्या आहेत.
संपादक शेख तय्यब यांची गेल्या एक महिन्यापूर्वी मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या संचालकपदी नियूक्ती झाली. त्याबरोबर विधानसभेची निवडणूक लागल्याने आचारसंहिता लागली. आचारसंहिता संपताच शेख तय्यब यांनी मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, जालना, औरंगाबाद, नांदेड, बुलढाणा आदी जिल्ह्याचा दौरा करत तेथील महामंडळाच्या कार्यालयाला भेटी देत महामंडळाच्या विविध योजनांचा प्रसार आणि प्रचार करण्याबाबत सूचना दिल्यानंतर शेख तय्यब हे विदर्भाकडे गेले. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यातील महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकासोबत आढावा बैठका घेतल्या. जिल्हा व्यवस्थापक नफीस शेख, मोहम्मद, ओवेस अन्सारी, तौफीक अन्सारी यांच्यासोबत चर्चा करून शैक्षणिक कर्जावर प्रामुख्याने लक्ष देण्याबाबत सूचना केली. त्याचबरोबर जनजागृतीला प्रामुख्याने प्रोत्साहन देण्याचे त्यांनी म्हटले. यावेळी काही व्यवस्थापकांनी कार्यालयामध्ये येणार्या अडचणीबाबत शेख तय्यब यांच्यासमोर गार्हाणे मांडले. त्यावर शेख तय्यब यांनी तात्काळ महामंडळाचे एम.डी. मगदूम साहेब यांच्यासोबत बोलून तात्काळ समस्या सोडविण्याबाबत सूचना केल्या.
पुढे शेख तय्यब हे अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, येवतमाळ येथील कार्यालयांमध्ये प्रत्यक्षपणे भेट देत येवतमाळचे जिल्हा व्यवस्थापक मुकूंद कठाणे, अमरावतीचे फरजान परवीन इनामदार, अकोल्याच्या ज्योती भगत, केशव घाटे, बुलढाण्याचे ज्योती हिवाळे, शेख साबेर यांच्यासोबत बैठक घेत लाभार्थ्यांना मदत करणे, लाभार्थ्यांच्या आलेल्या फाईल किरकोळ कारणासाठी आडून न धरणे, जे काम आले आहे ते जलदगतीने तात्काळ करणे याबाबतच्या सूचनांसह महामंडळाच्या विविध योजना विषयांची जनजागृती करण्याबाबत संंबंधीत व्यवस्थापकांनी सूचना केल्या.
शेख तय्यब यांची मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक पदावर नियूक्ती झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांच्या कालखंडात शेख तय्यब यांनी 25 जिल्ह्यातल्या कार्यालयांना भेटी देत तेथील कामकाजाचा आढावा घेतला. त्याचबरोबर त्यांच्या समस्या जाणून घेत मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे कामकाज जलदगतीने करण्याबाबत व्यवस्थापकांसह एमडींना सूचना केल्या.