बीड (रिपोर्टर): कारागृहाच्या मुख्य संरक्षण भिंतीवर आज एका अज्ञात व्यक्तीने कॅरीबॅग फेकून दिली. या कॅरीबॅगमध्ये मोबाईल, दोन चार्जर, गुटखा, एक गांज्याची पुडी आढळून आली आहे. सदरील हा प्रकार कर्मचार्याच्या निदर्शनास आल्यानंतर कर्मचार्याने याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आज सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान कारागृहाच्या संरक्षण भिंतीवर एक कॅरी बॅग फेकून दिल्याचे निदर्शनास आले. सदरील ही कॅरीबॅग शशीकांत खेडकर यांना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याची माहिती कारागृहाचे सुभेदार बलभीम चिंचाणे यांना दिली. ही कॅरीबॅग उघडून बघितली असता त्यामध्ये दोन चार्जर, एक मोबाईल, गुटखा, मावा, गांज्याची पुडी आढळून आली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.