खा. बजरंग सोनवणे, आ. सुरेश धस, आ. संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत होणार समारोप
गेवराई (रिपोर्टर) येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या अकरा शेतकर्यांसह शेतकर्यांना प्रोत्साहनपर सहकार्य करणार्यांना प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी पुरस्कार दिले जातात. या पुरस्कार वितरण व समारोप सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक महेश बेदरे व स्वागताध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, पुरस्कार समिती प्रमुख राजेंद्र आतकरे, कार्याध्यक्ष भाऊसाहेब शिंदे यांनी केले आहे.
गेवराई येथे किसान कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात आज दि. 7 जानेवारी रोजी किसान कृषिरत्न पुरस्कार वितरण व प्रदर्शनाचा समारोप सोहळा दुपारी 2:30 वा. संपन्न होणार आहे.
दरम्यान या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आष्टीचे आ.सुरेश धस, बीडचे आ. संदीप क्षीरसागर, आ. हेमंत उगले, माजी मंत्री बदामराव पंडित, माजी आ. लक्ष्मणराव पवार या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कारासाठी निवड झालेल्या शेतकर्यांना कृषिरत्न पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे. तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यास व समारोप कार्यक्रमास शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक महेश बेदरे पुरस्कार वितरण समिती प्रमुख राजेंद्र आतकरे यांनी केले आहे.
यांचा होणार पुरस्काराने सन्मान
या प्रदर्शनात देण्यात येणार्या या वर्षीच्या पुरस्काराचे मानकरी सौ. योगिता ज्ञानेश्वर चक्कर कोल्हेर, ज्ञानेश्वर लिंबाजी मुळे पौळाचीवाडी, मुकेश बालाजी सुरपाम, केवीके खामगाव, परमेश्वर सखाराम पुंड रेवकी, परमेश्वर ज्ञानेश्वर शिंदे मन्यारवाडी, सुदर्शन शिवाजीराव घोडके वडगाव ढोक, व्यंकटराव नागोराव जायनुरे मुखेड, सचिन आत्माराम पाटील होळकर लासलगाव, वाल्मीक गर्जे राजूरीमळा व प्रवीण आजबे वाघेरा, या शेतकर्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
तसेच दुसर्या दिवशी संपन्न झालेल्या पशुप्रदर्शनांमधील विजेत्या पशुधन मालकांनाही याच कार्यक्रमात बक्षीस देऊन गौरव करण्यात येणार आहे.