बीड, (रिपोर्टर)ः- सामाजिक कार्यकर्त्या तथा प्राध्यापक सुशिलाताई मोराळे यांचे पती डॉ.खिराजी पाखरे यांचे काल हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 72 वर्षे होते. आज सायंकाळच्या दरम्यान स्मशानभुमीत त्यांच्या पार्थीवदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ.पाखरे हे डोळ्याचे डॉक्टर होते. त्यांचे बीड शहरामध्ये खाजगी हॉस्पिटल होते. पाखरे यांचा जन्म 15 जुलै 1954 साली पाटोदा तालुक्यातील भायाळा येथे झाला होता. डॉ.पाखरे यांच्या पश्चात पत्नी सुशिलाताई मोराळे, मुले डॉ.अजित पाखरे, डॉ.शिवराज पाखरे सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. आज सायंकाळच्या दरम्यान त्यांच्या पार्थीवदेहावर संत भगवान बाबा प्रतिष्ठाणच्या पाठीमागील स्मशानभुमी या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मोराळे व पाखरे कुंटूबीयांच्या दुःखात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.