कामखेड्याची जनता रस्त्यावर उतरणार
बीड, (रिपोर्टर)ः- कामखेडा येथे जलजीवन योजने अंतर्गत 1 कोटी 81 लाख 97 हजार 700 रूपयांचा खर्च करण्यात आला. हा खर्च तेवढा सार्थकी लागला नाही. एवढे पैसे खर्च करूनही गावकर्यांना वेळेवर पाणी मिळत नाही. येत्या 15 दिवसात सुरूळीतपणे पाण्याचा पुरवठा न झाल्यास नागरीक 7 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये जलजीवन योजना राबविण्यात आली. अनेक गावामध्ये या योजनेचा बट्टयाबोळ झाला. गुत्तेदार व ग्रामपंचायतीने संगनमत करून या योजनेचे माथेरे केले. बीड तालुक्यातील कामखेडा येथे 1 कोटी 81 लाख 97 हजार 700 रूपयांची जलजीवनची योजना राबविण्यात आली. या योजनेचे काम व्यवस्थीत झाले नाही. जागो जागी पाईपलाईन लिकेज होते. टाकीमध्ये पाणी सोडण्यासाठी विविध अडचणी निर्माण होतात. त्यामुळे गावकर्यांना 15 दिवसाला पाणी मिळू लागले. व्यवस्थीत पाणी पुरवठ्या संदर्भात तक्रारी करण्यात आल्या. मात्र त्याची दखल घेतली नाही. जि.प. पाणी पुरवठा विभागही याकडे दुर्लक्ष करीत आहे. येत्या 15 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास नागरीक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहेत असा इशारा शेख हमीद, नेवडे गणेश, बाबासाहेब केशव नेवडे, शेख मुस्ताख, भाऊसाहे ढोरमारे, शेख इसाक यांनी दिला आहे.
——-
लिंबारूईमध्ये मनरेगाची कामे बोगस
शासनाचे लाखो रूपये वायाला गेले
बीड, (रिपोर्टर)ः-बीड जिल्ह्यासह राज्यात मनरेगाची योजना राबविली जाते. यामध्ये अनेक ठिकाणी बोगस कामे होत आहेत. रूई शहाजानपुर या ठिकाणी फळबाग, गाई गोठा, पाणंद रस्ते यासह इतर कामे बोगस झालेले आहेत. याकामाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विकास ओव्हाळ यांनी केली आहे.
बीड तालुक्यातील रूई शहजानपूर येथे रोहियो अंतर्गत फळबाग, गाईगोठा, पाणंद रस्ते, सिमेंट रस्ते इत्यादी कामे कागदावर दाखविण्यात आली. याकामाचे बोगस मस्टर काढण्यात आले. तसेच कुशल बिल देखिल काढले गेले. या सर्व कामामध्ये मोठ्या प्रमाणात भष्टाचार झालेला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी विरोधात कारवाई करावी अशी मागणी विकास ओव्हाळ यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.