बीड, (रिपोेर्टर)ः- बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये दोन गुंडांच्या टोळीमध्ये वाद झाल्याच्या बातम्या प्रसारीत झाल्यानंतर कारागृह प्रशासन सतर्क झाले असून काल त्यांनी गित्ते गँगला बीड कारागृहातून स्थलांतरीत केल्यानंतर आज आठवले गँगला नाशिकच्या कारागृहामध्ये हलवण्यात आले आहे.
काल बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये गुंडांचे टोळीयुद्ध झाल्याचे प्रकरण समोर आले. यात जिल्हा कारागृह अधिक्षकांनी फोन लावण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. मात्र ज्या बातम्या प्रसारीत झाल्या त्या चुकीच्या आहेत, अशा आशयाचे प्रसिद्धी पत्रक काढले. परंतु काल अचानक गित्ते गँगला बीड जिल्हा कारागृहातून अन्य कारागृहामध्ये स्थलांतरीत करण्यात आले होते. पाठोपाठ आज आठवले गँगच्या तीन आरोपींना बीड जिल्हा कारागृहातून नाशिक कारागृहात हलवण्यात आले आहे. यामध्ये मनीष क्षीरसागर, ओंकार सवाई आणि अक्षय आठवलेचा समावेश आहे.