माजलगावपासून सुरू केली पाहणीला सुरुवात
बीड (रिपोर्टर): रोजगार हमी योजनेचे औरंगाबाद विभागाचे सहाय्यक आयुक्त हे बीड जिल्ह्याच्या दौर्यावर ते माजलगाव, वडवणी, बीड तालुक्यातील रोहयोच्या कामाची पाहणी करणार आहेत. त्यांनी पहिल्यांदा माजलगाव येथील काही ठिकाणी पाहणी केल्याचे सांगण्यात येते. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात ते बैठक घेणार आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये वर्षभरात रोहयोंची अनेक कामे झाली आहेत. या कामांची पाहणीसाठी रोहयोचे औरंगाबाद विभागाचे सहाय्यक आयुक्त अनंत गव्हाणे जिल्हा दौर्यावर आहेत. त्यांनी सकाळी माजलगाव येथून कामाच्या पाहणीला सुरुवात केली. माजलगावनंतर वडवणी आणि बीड येथील ते कामांची पाहणी करणार आहेत. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयचाया नियोजन विभागात ते अधिकार्यांची बैठक घेणार आहेत.