ही निव्वळ अफवा-सीओ निता अंधारे

बीड, (रिपोर्टर)ः- बीड शहराला पाणी पुरवठा करणार्या पाईपलाईनमध्ये मृत झालेली आणि सडलेली कुत्रे सापडली अशी अफवा दोन दिवसापासून शहरात पसरली आहे. मात्र यामध्ये काहीही तथ्य नसून ही अफवा असून त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन एका परिपत्रकाद्वारे नगर पालिका सीओ निता अंधारे यांनी केली आहे.
पाईपलाईनमध्ये सडलेली कुत्रे सापडली आहेत अशीजी अफवा पसरली आहे. त्यामुळे शहरातील नागरीकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. नळाला पाणी आल्यानंतर ते भरायचे की नाही, त्यातून मोठ मोठे रोग होवू शकतात अशी सर्वत्र सुरूवातीला नागरीकामध्ये कुचबूच आहे. या बाबीवर नगर पालिका प्रशासनाने खुलासा करत माजलगाव बॅक वॉटरद्वारे बीड शहराला पाणी पुरवठा करणार्या पाईपलाईनमध्ये मृत आणि सडलेली कुत्रे सापडली हे निव्वळ तथ्यहीन वृत्त असल्याचेही सीओ निता अंधारे यांनी म्हंटले आहे.