बीड, (रिपोर्टर)ः- गतवर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीमुळे जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 आणि 4 कर्मचार्यांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. जिल्हा परिषदेचे सर्वात मोठे केडर असलेल्या प्राथमिक शिक्षकाच्या बदल्या ह्या ऑनलाईनद्वारे होतात तर इतर कर्मचार्यांच्या बदल्या ह्या बदली पात्र करणार्यांची प्रशासकीय बदली, विनंती बदली असा दोन प्रकारात या बदल्या केल्या जातात.
जिल्हा परिषदेच्या नऊ विभागातील कर्मचार्यांच्या बदल्या ह्या समुपदेशाने होण्यासाठी लवकरच राज्य सरकारकडून वेळापत्रक जाहिर करण्यात येणार असून त्या अनूषंगाने बीड जि.प.तील कर्मचार्यांच्या बदल्या होणार आहेत.