समुउपदेशाने पदस्थापना होणार
बीड, (रिपोर्टर)ः- ग्रामसेवक या संवर्गातून विस्तार अधिकारी पंचायत या पदासाठी आज जिल्हा परिषदमध्ये समुपदेशन ही प्रक्रिया राबविण्यात येणार असून जे वरिष्ठ ग्रामसेवक आहेत, जे विस्तार अधिकारी या पदासाठी पात्र आहेत अशा सर्वाना आज जि.प.मध्ये समुपदेशन होणार आहे.
पुर्वी ग्रामसेवक आणि इतर तस्सम पदासाठी पदस्थापना देतांना समुपदेशन केले जात नव्हते त्यातून मोठ्या प्रमाणात घोडे बाजार होत होता. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने यांनी प्रमोशनचे पदस्थापना देतांना समुपदेशन ही प्रक्रिया अवलंबिली आहे. त्यातून रिक्त असलेल्या जागा आणि पात्र असलेले कर्मचारी बोलविण्यात येतात. आज जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये ग्रामसेवकातून विस्तार अधिकारी यांची पदस्थापना देण्यात येणार आहे.