
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये जन्मतारखेचे बनावट दाखले दिलेले आहेत. ज्या प्रशासकिय अधिकार्यांनी हे बनावट दाखले दिले त्यापैकी काहींवर गुन्हे दाखल केलेले अहेत. त्यात अद्याप काहीजण मोकाटच आहेत. तर याबाबतचा तपास वेग घेत नसल्यामुळे भाजपाचे खासदार किरीट सोमय्यांनी आज पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांची भेट घेतली. या प्रकरणामध्ये ज्यांच्यावर अद्याप गुन्हे दाखल नाहीत त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि तपासाची गती वाढवावी यामागणीसाठी भेट घेतली.
बनावट जन्मतारखेच्या दाखल्यांमध्ये परळी तालुक्यात हे बनावय दाखले दिलेले आहेत. काही प्रमाणात हा प्रकार जिल्ह्यात इतर ठिकाणीही झालेला आहे. त्यातील दोषींवर गुन्हे दाखल झालेले आहेत. पण ज्यांनी हे प्रकार केले त्यातील त्यातील काही जणांवर अद्याप गुन्हे दाखल नाहीत आणि ज्या गतीने या प्रकरणाचा तपास व्हायला पाहिजे तो तपास असमाधानकारक असल्यामुळे तपासाची गती वाढवावी या व इतर मागण्यांसाठी आज भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी पोलीस अधिक्षकांनी भेट घेतली आहे.