वार्डात दोन नगरसेवक असून फायदा काय?
फक्त निवडणुकीतच लोकांना गोड बोलायचं का?
बीड (रिपोर्टर)ः- बीड शहरातील इस्लामपूरा भागात रस्त्यावरुन नालीचे पाणी वाहत आहे. हे पाणी लोकांच्या घरामध्ये, व्यापार्यांच्या दुकानामध्ये जात असल्याने या भागातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले. नाल्या काढण्यासाठी नगर पालिकेकडे कर्मचारी नाहीत की या भागाकडे कर्मचारी येत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुर्देवाची बाब म्हणजे या वार्डात दोन नगर सेवक आहेत तरीही अशा पध्दतीचा कारभार वार्डामध्ये पहावयास मिळत आहे. निवडणुकीतच फक्त नगरसेवक लोकांना गोड बोलतात. एकदा निवडणुका झाल्या की लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते.
शहरातील वार्ड क्र. 18 इस्लामपूरा या ठिकाणी नाल्या वेळेवर काढल्या जात नाही. त्यामुळे नाल्याचे पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. काल दिवसभर नालीचे पाणी रस्यावरुन वाहत होते. याचा त्रास तेथील नागरीकांसह येणार्यार जाणार्या नागरीकांना सहन करावा लागत होता. हा प्रकार नेहमीचाच आहे. नगर पालिकेकडे स्वच्छता विभागामध्ये कामगार नाहीत का? अशा सतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत आहे. या वार्डात दोन नगर सेवक आहे. हे दोन्ही नगर सेवक सत्ताधारी पक्षाकडे गेले होते. तरीही वार्डातील दुर्देशा दिसून येत आहे. निवडणुकीतच लोकांना गोड बोललं जातं. निवडणुका झाल्या की, लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संधीसाधू पुढार्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.