
गेवराई (रिपोर्टर) आज दि. 11 मे रोजी वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भारत-पाक युद्धजन्य परिस्थीतीत भारतीय सैनिकांचे मनोधैर्य उंचाविण्यासाठी गेवराई शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या अदेशावरुन आज दि. 11 मे रोजी संपूर्ण राज्यभर तिरंगा रॅली काढण्याचे निर्देश देण्यात आले होते, त्यानुसार वंचित बहुजन आघाडी तक्रार निवारण समितिचे राज्याध्यक्ष मा. विष्णु जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गेवराई तालुका अध्यक्ष पप्पु गायकवाड व बीड जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ पोकळे यांच्या नेतृत्वाखाली गेवराई शहरात मोटारसायकलवरून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली होती, यावेळी जय भारत, जय जवन जय किसान या घोषणांनी अक्षरशः गेवराई शहर दणाणून गेले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधानाच्या प्रस्तावनेला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करुन शास्त्री चौक येथे लालबहादूर शास्त्री यांना पुष्पहार अर्पण करून, शहिद जवानांना श्रध्दांजली अर्पण करून रॅलिचा समारोप केला यावेळी किशोर भोले, अर्जून सुतार, अमोल सुतार, अॅड. सोमेश्वर कारके, ज्ञानेश्वर हवाले, भारत हवाले,प्रकाश भोले, छगण खरात, माणिक राठोड, किशोर चव्हाण,बप्पासाहेब काळे, शिवाजी केदार, विकास गायकवाड, प्रशांत केदार,सुनिल चव्हाण, नितिन खापरे, देवेंद्र धुरंधरे, कृष्णा हतागळे, साईनाथ सुतार, सतिष नाडे, सिध्दार्थ शेजुळ, महादेव निकाळजे, सतिश निकाळजे, अंकुश बनसोडे, संतोष पवार, कैलास बनसोडे, अतुल हतागळे, चरणदास हतागळे, अमोल पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.