
गेवराई (रिपोर्टर): कार व बसच्या झालेल्या भीषण अपघातात गेवराईतील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल साडेतीन वाजेच्या सुमारास धुळे-शेगाव राष्ट्रीय महामार्गावरील बाळापूर नजीक घडली.
पवन रावसाहेब राठोड(वय 30) रा.रोकडा-जातेगाव,ता.गेवराई जि.बीड असे या आपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.परवा गेवराईतील जातेगाव येथून बसने कार खरेदी करण्यासाठी पवन हा धुळे येथे गेला होता.काल कार घेऊन परत घराकडे येत असताना साडेतीन वाजेच्या सुमारास धुळे-शेगाव राष्ट्रीय महामार्गावरील बाळापूर नजीक येथे कारला बसने धडक दिल्याने कारमधील पवन राठोड याचा जागीच मृत्यू झाला.या आपघाताची माहीती जातेगावात धडकताच गावातील नागरिक तसेच पवन याचे भाऊ डॉ.जिवन राठोड यांनी आपघात झालेल्या ठिकाणी धाव घेतली. पोलीस पंचनामा आणि शवविच्छेदन केल्यानंतर आज मुळ गाव रोकडा येथे पवन याच्या पार्थिवावर चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, पवन राठोड याच्या आपघाती मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गेवराईत हळहळ व्यक्त होत आहे.