
बीड जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राखण्यासाठी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत यांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्हयातील गुन्हेगारीचे व गुंडगिरीचे समुळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन चउजउ- व चझऊ- व कलम 55,56,57 मपोका अन्वये बर्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचा धडाका बीड जिल्हाचे पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली बीड पोलीसांनी सुरु ठेवला आहे. जनतेच्या जिविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी जिल्हयात चोर्या, दरोडे, घरफोड्या, खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडयाची तयारी, बलात्कार, जुलुमाने घेणे, पळवून नेणे, खंडणी मागणे या व अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणार्या गुन्हेगारांविरुध्द ठोस कारवाई करण्यासाठी बीड जिल्हयातील पोलीस जिल्हयातील व जिल्हाचे बाहेरील गुन्हेगांरावर करडी नजर ठेऊन आहेत.
दिनांक 01/03/2025 रोजी मा. न्यायालयाचे आदेशान्वये पो.स्टे. परळी शहर गुरनं 44/2025 कलम 307, 326,392,394,323,324,504,506,34 भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयातील फिर्यादी नामे सहदेव वाल्मीक सातभाई वय 28 वर्षे व्यवसाय शेती रा. तडोळी ता. परळी जि. बीड हे दिनांक 18/10/2023 रोजी दुपारी 04.30 वाजता तडोळी येथुन परळी वै. येथे ट्रॅक्टरचे काम करण्यासाठी व हप्ता भरण्यासाठी घरतुन 2,70,000/- रुपये घेवुन मोटार सायकलवर परळी येथील शिवाजीचौकामधुन सातबारा आनण्यासाठी जलालपुर रोडवरली तलाठी कार्यालयाकडे मोटार सायकलने जात असतांना जलालपुर रोडच्या कमानीजवळ मो. सा. समोर पांढर्या रंगाची स्कॉर्पिओ चक44न0806 आडवी लावुन आरोपी रघुनाथ फड व ईतर 7 ते 8 जण असे सर्व जण वेळुच्या काठ्या व लोखंडी रॉड घेवुन खाली उतरले व फिर्यादीस गाडीवरुन ओढुन खाली पाडले व रघुनाथ फड म्हणाला की, याला मारा याला सोडु नका भडवा लई माजला आहे असे म्हणाला त्यावेळ ईतर आरोपीतांनी फिर्यादीस खाली पाडुन तोंडावर पाठीवर काठीने सपासप मारहाण करुन जखमी केले व लोखंडी रॉड़ने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर मारले त्यामुळे फिर्यादी गंभीर जखमी झाला त्यावेळी आरोपीने फिर्यादीस फरशी उचलुन जिवे मारण्याचे उद्देशाने मारहाण केली. यात फिर्यादीचा डावा पाय फॅक्चर झाला. त्यावेळी रघुनाथ फड व इतरांनी फिर्यादीचा मोबाईल व पॅन्टच्या खीशातील 2,70,000/- रुपये रोख काढुन घेतले फिर्यादी जोरजोरात ओरडल्याने जमाव जमला. तेंव्हा आरोपी स्कॉर्पिओ गाडीतुन निघुन गेले. जातांना म्हणाले की, तु आता वाचलास परंतु नंतर आम्ही तुला जिवंत सोडणार नाहीत अशी धमकी देवुन निघुन गेले वगैरे मचकुराचे फिर्याद वरुन सदरचा गुन्हा उीझउ कलम 156(3) अन्वये मा. न्यायालयाचे आदेशाने दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचे तपासात परळी शहर पोलीसांनी आरोपींचा बारकाईने शोध घेवुन सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी टोळी प्रमुख नामे रघुनाथ रामराव फड वय 30 वर्ष रा. रामनगर ता. परळी जि. बीड यास दिनांक 07/03/2025 रोजी अटक केली. तसेच गुन्ह्यातील आरोपी क्र. 2) जगन्नाथ विक्रम फड वय 45 वर्ष रा. बजरंग नगर परळी वै. जि. बीड. 3) सुदिप रावसाहेब सोनवणे वय 28 वर्ष रा. सिध्दर्थ नगर परळी वै. जि. बीड. 4) बालाजी अंकुश दहीफळे वय 24 वर्ष रा. माणिक नगर परळी वै. जि. बीड. 5) विलास बालाजी गिते वय 27 वर्ष रा. नंदागौळ ता. परळी वै. जि. बीड. यांना दिनांक 28/03/2025 रोजी 20.34 वा. अटक करुन तपास करण्यात आला व सदर गुन्ह्यातील 02 आरोपी फरार आहेत. सदर टोळी ने आज पावेतो संघटीतरीत्या पो. स्टे. परळी शहर, संभाजीनगर व अंबाजोगाई ग्रामीण हद्दीत एकुण 10 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्यात खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, दंगा करणे, कट रचणे, अवैध शस्त्र बाळगणे, जबरी चोरी करणे, दरोडा टाकणे, रस्ता आडवीणे, मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आनने, गंभीर दुखापत करणे या सारखे गंभीरस्वरुपाचे गुन्हे केले आहेत. प्रस्तावात एकुण 10 गुन्हे विचारात घेण्यात आले. त्यापैकी 09 गुन्हयांची दखल न्यायालयाने घेतलेली असुन 01 गुन्हा पोलीस तपासावर आहे. सर्व गुन्हे 10 वर्षाच्या आतील असुन 03 वर्षापेक्षा जास्त शिक्षेस पात्र आहेत. सदर टोळीचा टोळी प्रमुख याने स्वतःच्या व टोळीतील इतर सदस्यांच्या आर्थीक फायदयासाठी सदरचे गुन्हे केल्याचे पोलीस अधीक्षकांच्या चानाक्ष नजरेतुन लपुन राहीले नाही. त्यावरुन बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सुचने वरुन सदर प्रकरणांत तपासी अधिकारी पोनि रघुनाथ नाचण पो.स्टे. परळी शहर यांनी अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई व उपविपोअ अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली सदर टोळी विरुध्द मोक्का कायद्या अंतर्गत प्रस्ताव तयार करुन दिनांक 29/04/2025 रोजी पोलीस अधीक्षकांना सादर केला होता. पोलीस अधिक्षक, श्री नवनीत कॉवत यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन दिनांक 04/05/2025 रोजी प्रस्ताव आपले शिफारशी सह मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांना सादर केला होता.
मा. श्री.विरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन दिनांक 07/05/2025 रोजी नमूद संदर्भीय गुन्हयांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 मधील कलमांचा अंतर्भाव करण्याची परवानगी दिल्याने पोलीस अधीक्षक बीड यांनी सदर प्रकरणांचा पुढील तपास श्री. अनिल चोरमले, उपविभागीय पोलीस अधिकारी, अंबाजोगाई यांचेकडे दिला आहे व मोक्का कायदयाचे कलम 3(1) (ळळ),3(2),3(4) समाविष्ठ करणे बाबत आदेशीत केले आहे. त्यावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी अंबाजोगाई हे सदर गुन्हयांचा पुढील तपास करीत आहेत. सदर प्रकरणांत 01 आरोपी अटक असुन 02 आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांच्या शोधात आहेत. तसेच नमूद गुन्हातील मा. न्यायालयाकडून जामीन मंजुर झालेल्या 04 आरोपींचे जामीन रद्द करण्यासाठी तपास अधिकारी यांनी प्रस्ताव मा. न्यायालयात सादर केले आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल चोरमले, पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख, स्थागुशा बीड, यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री रघुनाथ नाचण, सपोनि योगेश शिंदे पो.अं. पंडीत पांचाळ, धनश्री भताने, किशोर घटमळ पो. स्टे. परळी शहर तसेच सपोउपनि अभिमन्यु औताडे, निलेश ठाकुर, बिभीषण चव्हाण स्थागुशा बीड यांनी केली आहे. भविष्यातही शरीराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गंभीर गुन्हे करणार्या सराईत गुन्हेगार व गुन्हेगारांच्या टोळयावर व कायद्याला न जुमानणार्या व्यक्ती विरुध्द तसेच बीड जिल्ह्यात धुमाकुळ घालणार्या गुन्हेगारांवर मोक्का व एम.पी.डी.ए. कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री नवनित काँवत यांनी दिले आहेत. ReplyForwardAdd reaction