गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील खोरी तांडा जांभळी तांडा, खोपटी तांडा, मोहाचा मळा, रामनगर तांडा व पांगरी ग्रामपंचायत अंतर्गत हरिलाल नाईक तांडा, रामुनाईक तांडा ,रोकडा तांडा डांबरीकरण रस्त्यासाठी जातेगाव फाटा 222/61 वर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व उपसरपंच रामेश्वर पवार, माजी जि.प.सदस्य प्रा.पी. टी चव्हाण, डॉक्टर जीवन अण्णा राठोड, मा.सरपंच गणेश चव्हाण, दत्ता वाघमोरे, चेअरमन शंकर पवार, रमेश पवार ,सर्जेराव जाधव, सतीश पवार, नितीन पवार, आदींनी केले.
दरम्यान यावेळी अभियंता नागरगोजे यांनी या रस्त्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली व पुढील कार्यवाही संदर्भात त्यांनी त्यांचे परिपत्रक दाखवले असून यामध्ये काही तांड्यांना नंबर नसल्यामुळे हे कामे करता येत नव्हती मात्र आता त्या रस्त्याच्या नंबरची नोंदणी झालेली असून या बाबत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन प्रस्ताव ही पाठवण्यात आले अशी माहिती दिली असून याबाबत लेखी पत्र प्रशासनाच्या वतीने दिल्यानंतर हे रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी माजी पं. स. सदस्य विलासराव चव्हाण, सरपंच सतीश चव्हाण, कृष्णा गोटीराम पवार, सतीश राठोड, विष्णू राठोड, संजय राठोड, सुजित पवार, जालिंदर राठोड, शेषराव राठोड, नवनाथ पवार, अनिल पवार, बाबुराव भाऊ चव्हाण, गोपाल चव्हाण, भागवत ढोरमारे, विष्णू पवार, गणेश पवार, देवराज कोळे, नवनाथ चव्हाण, अभय पाढरे, अमोल धोंडरे, छगन पवार, अंकुश धोडरे, बाळासाहेब चव्हाण, पांडू जाधव,पवन जाधव, अजय डोंगरे, रविराज राजराम पवार, मनोज जाधव, परमेश्वर पवार, आदी उपस्थित होते. यावेळी तलवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, उपनिरीक्षक भवर साहेब व पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते.