तीन वर्षापासून नविन शिधापत्रिका मिळेनात
प्रशासन बनल एकाच नाण्याच्या दोन बाजू
प्रशासनाच्या विरोधात महिलेचा संताप
वडवणी (रिपोर्टर):- गेल्या तीन वर्षापासून पुरवठा विभागाकडे नविन शिधापत्रिका मिळावी म्हणून अर्ज केले आहेत.वारंवार विभागाकडे चकरा मारण्यात आल्या,निवेदन आणि उपोषण करुन आणि शिधापत्रिका उपलब्ध आसताना देखील देण्यात येत नसल्या प्रकरणी उपळीचे ग्रामस्थासह महिला वडवणी तहसिल कार्यालया समोर अमरण उपोषणाला बसले आहेत.
याबाबत आधिक माहिती अशी कि,वडवणी पुरवठा विभागात मनमानी कारभार असल्याच बोलल जात आहे.अशा कारभाराचे अनेकदा वाभाडे देखील निघून सुध्दा प्रशासन ढिल अवस्थेत असल्याच दिसून येत आहे.गेल्या तीन साडे तीन महिन्यापासून हजारो शिधापत्रिका कार्यालयात उपलब्ध आहेत.काम धिम्या गतीने चालू आहे.तर मागील (पान 7 वर)
काळात केलेले अर्ज पुन्हा अर्ज करण्यास पुरवठा विभाग सांगत आहे.पुन्हा अर्ज का करावा ? असा प्रश्न उपस्थित राहत आहे.तर वडवणी तालुक्यातील मौजे उपळी येथील ग्रामस्थ देखील याच कारभाराला वैतागले आहेत.नविन शिधापत्रिका मिळावी म्हणून तीन वर्षापुर्वी नविन शिधापत्रिका मिळाव्यात म्हणून अर्ज केले आहेत.अर्जावर आजपर्यत कुठलीच कार्यवाही झालेली नाही.जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयात अर्ज,उपोषण करुन देखील फक्त आश्वासन देण्यात आले आहेत.यामुळे लाभार्थ्याना
लढा प्रशासनाला समजेना – एजाज शेख
वडवणीचा पुरवठा विभाग कोणाच्या दलालीवर चालतो हे माझ्या सारख्या सुशिक्षित बेकाराला समजेना माझ्या सारख्याचे हे हाल आहेत.मग अशिक्षित लोकांचे काय हाल असतील अशा प्रश्न उपस्थित करत वारंवार चक्करा मारल्या, अर्ज, निवेदन आणि उपोषण करुन देखील फक्त आश्वासन मिळाले आहेत.काही महिन्यापुर्वी नविन शिधापत्रिका उपलब्ध होवून देखील आजचा दिवस उद्यावर नेत प्रशासन काम करत आहे.या कारभाराचा वैताग आला असून हा लढा प्रशासनाला समजेना वाटाय लागला आहे.अशी प्रतिक्रिया ह.टिपू सुलतान युवा मंचाचे वडवणी तालुकाध्यक्ष तथा उपळीचे रहिवाशी आसणारे युवा नेते एजाज नवाज शेख यांनी दिली आहे.
धान्यासह विविध योजनेचा लाभ मिळत नसल्याने लाभार्थ्यामधून संताप व्यक्त केला जात असल्याने आज सकाळी 30 व्यक्तीपेक्षा आधिक महिलासह मौजे उपळी येथील लाभार्थी वडवणी तहसिल कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसले आहेत.कर्तव्यदक्षपणा पुरवठ्यात दिसेना
वडवणी तहसिलदार दत्ता भारस्कर हे अंत्यत शिस्तबध्द आणि कर्तव्यदक्ष व निष्ठ आहेत.असं बोलल जात आहे.तर त्यांच्या कामाची चाहूल अनेकांनी पाहिली आहे.परंतु पुरवठा विभागातच असा कारभार का दिसून येत आहे.अर्ज करुन देखील सामान्य माणसांना साधी शिधापत्रिका मिळत नसल्याने संविधानिक मार्गाने अमरण उपोषणाचे हत्यार उपसावे लागत आहे.हि दुदैवी गोष्ट म्हणावी लागेल? तहसिलदार साहेब आपण यात लक्ष घालून तूमच्यातला कर्तव्यदक्षपणा दाखवून सामान्य माणसाला शिधापत्रिका लवकरात लवकर देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा प्रत्येक लाभार्थी करत आहे.