बीड । ऑनलाईन रिपोर्टर
स्वत:च्या भरश्यावर उभं राहिलेले हे नेतृत्व सातत्याने दुसर्यांसाठी काम करत राहील. जे कामी मागायचं ते समाजासाठी मागायचं स्वत:साठी काही मागायच नाही आसा निर्मळ आणि निस्वार्थी मित्र मी गमावला आहे. मेटेंच्या जाण्याने वयक्तीक दृष्ट्या माझी सर्वात मोठी हाणी झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी म्हटले.
शिसवंग्रामचे सर्वेसर्वा विनायक मेटे यांचे काल अकाली अपघाती निधन झाले. त्यांच्या पार्थिवदेहावर आज बीड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी श्रधांजली आर्पण करतांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस म्हणाले काय बोलाव शब्द सुचत नाहीत. पर्वा रात्री सव्वा दोन वाजता त्यांचा मला एसएमएस आला होता. मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावल्याचे त्यांनी म्हटले. उद्या आपण बोलू असेही त्यांनी त्यामध्ये म्हटलं होत. मात्र काल त्यांचा अपघातात दुदैवाने मृत्यू झाला. वयक्तीक दृष्ट्या ही माझी सर्वात मोठी हाणी आहे. ते आत्यंत जवळचे मित्र होते. 15 दिवसात एकदा तरी आम्ही भेटायचो चर्चा करायचो. स्वत:साठी कधीही काहीही ते मागत नव्हते. जे मागायचे ते समाजासाठी मेटेंचं नेतृत्व हे स्वत:च्या भरवश्यावर उभ राहिलेल नेतृत्व होत. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. विनायकरावांनी जे जे काम हाती घेतले होते. ते पूर्ण करण्याचा शब्द यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी दिला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री विखे पाटील, तान्हाजी सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खा. श्रीकांत शिंदे, माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, आ. भीमराव केराम, आ. संदीप क्षीरसागर, भारती लव्हेकर, आ. लक्ष्मण पवार, आ. सुरेश धस, आ. अभिमन्यू पवार, माजी मंत्री सदाभाऊ खोत, पाशा पटेल, नमिता मुंदडा, आ. श्वेता महाले, आ. सुमन आर. पाटील, आ. धनंजय मुंडे, खा. प्रतिम मुंडे, पंकजाताई मुंडेे, खा. जलील, आ. रत्नाकर गुट्टे, आ. बाळासाहेब आजबे, संजय दौड, अशोक पाटील, सुनिल धांडे, सुरेश नवले, राजेंद्र जगताप, जनार्धन तुपे, मात्री मंत्री खोतकर, सिराज देशमुख, माजी मंत्री, जयदत्त क्षीरसागर, पापा मोदी, आ. प्रकाश सोळंके, बदामराव पंडीत, औरंगाबाद विभागाचे पोलिस महानिरीक्षक मल्लीकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधीक्षक ठाकूर, उपविभागीय अधिकारी नामेदव टिळेकर, तहसीलदार सुहास हजारे, अधीक्षक कृषी अधिकारी जेजूरकर, कृषी अधिकारी साळवे, प्रा. मोराळे, अशोक हिंगे, अनिल जगताप, केशव आंधळे, कुडलकी खांडे, मुळकू, भीमराव धोंडे, साहेबराव दरेकर, फुलचंद कराड, टी. पी मुंडे, नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, पप्पू कागदे, आदी मान्यवर उपस्थित होते.